उल्हासनगर - पोलीसासह अधिकारी व त्यांच्या कुटुंबाचे जिवन मानसिक ताणतणाव मुक्त व शांततेत राहण्यासाठी वेलनेस क्लिनिक उभे राहिले. क्लिनिकचे उदघाटन पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्या हस्ते झाले असून दर आठवड्याला शिबीर होणार आहे. तसेच दर बुधवारी पोलिसासह कुटुंबाला तज्ञाकडून धडे व उपचार देण्यात येणार आहे.
उल्हासनगर पोलीस परिमंडळातील पोलिसांसह त्यांचे कुटुंब मानसिक ताणतणाव मुक्त व शांततेत राहण्यासाठी वेलनेस क्लिनिक उभे राहिले. क्लिनिकचे उदघाटन सोमवारी पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्या हस्ते झाले. या क्लिनिक मध्ये पोलिसांसह त्यांच्या कुटुंबाना मानसिक ताणतणाव मुक्त व शांततेसाठी दर आठवड्याला शिबिराचे आयोजन केले जाणार आहे. जे पोलीस मानशिक ताणतणावग्रस्त आहेत. त्यांना तज्ञाकडून सल्ला व उपचार करण्यात येणार आहे. पोलिसांचा मानसिक ताणतणाव व त्यांच्या कुटुंबात शांतता राहावे. यासाठी वेलनेस क्लिनिक सुरू केल्याची माहिती पोलीस उपायुक्त गोरे यांनी दिली. पोलीस परिमंडळा मधील प्रत्येक पोलीस ठाण्याचे प्रत्येकी १० पोलीस कर्मचारी मार्गदर्शन शिबिरात सहभागी होणार आहेत.
५ पोलिसांना तज्ञाकडून उपचार पहिल्या शिबिराला ८५ पोलीस कर्मचारी व १२ अधिकाऱ्यांनी लाभ घेतला. त्यापैकी ५ पोलीस कर्मचाऱ्यांनी तज्ञाचा सल्ला घेऊन, स्वतःसह कुटुंबातील व्यक्तीवर उपचार करणार आहेत. दर आठवड्याच्या शिबिरानंतर बुधवारी तज्ञाकडून पोलीस कर्मचारी व कुटूंबाना तज्ञाकडून उपचार घेतला जाणार आहे.
Web Summary : Ulhasnagar police launch a wellness clinic offering stress management sessions for officers and their families. Weekly camps and expert consultations every Wednesday aim to improve mental well-being and family harmony. Initial session saw 85 officers and 12 officials participating, with 5 seeking further family consultation.
Web Summary : उल्हासनगर पुलिस ने पुलिस अधिकारियों और उनके परिवारों के लिए तनाव प्रबंधन सत्र प्रदान करने वाला एक वेलनेस क्लिनिक शुरू किया। साप्ताहिक शिविर और हर बुधवार को विशेषज्ञ परामर्श का उद्देश्य मानसिक भलाई और पारिवारिक सद्भाव में सुधार करना है। शुरुआती सत्र में 85 अधिकारियों और 12 अधिकारियों ने भाग लिया, जिनमें से 5 ने आगे पारिवारिक परामर्श मांगा।