शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
4
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
5
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
6
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
7
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
8
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
9
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
10
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
11
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
12
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
13
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
14
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
15
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
16
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
17
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
18
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
19
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
20
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या

धार्मिक कार्यक्रमांत भिवंडीतील मदरसातील ३० विद्यार्थ्यांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 01:55 IST

भिवंडी : शहरात दर्गारोड-रोशनबाग परिसरांतील धार्मिक कार्यक्रमांत काल मंगळवारी दुपारी जेवण करून आलेल्या मदारशातील ३० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते.परंतू त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना बुधवारी रात्री स्व.इंदिरागांधी स्मृती रूग्णालयांत प्राथमिक उपचार करून मुंबईतील नायर हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले.दर्गारोड-रोशनबाग भागात मेहबूब कंपाऊंडमध्ये उर्दु जमाती अव्वल माहिन्याच्या ...

ठळक मुद्दे२४ विद्यार्थी उपचारासाठी मुंबईतील नायर रूग्णालयांत रवानासार्वजनिक जेवणाच्या कार्यक्रमांत जेवल्याने झाली विषबाधामदारशातील ३० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याने उपचार सुरू होते

भिवंडी : शहरात दर्गारोड-रोशनबाग परिसरांतील धार्मिक कार्यक्रमांत काल मंगळवारी दुपारी जेवण करून आलेल्या मदारशातील ३० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते.परंतू त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना बुधवारी रात्री स्व.इंदिरागांधी स्मृती रूग्णालयांत प्राथमिक उपचार करून मुंबईतील नायर हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले.दर्गारोड-रोशनबाग भागात मेहबूब कंपाऊंडमध्ये उर्दु जमाती अव्वल माहिन्याच्या निमीत्ताने गैरवी की नियाज हा सार्वजनिक जेवणाचा कार्यक्रम आयोजीत केला होता.त्यासाठी तेथील मुख्तार अताऊल्ला शेख यांनी काल मंगळवार रोजी दिवानशहा येथील दारु ल ऊलुम मदरसातील बारा ते चौदा वयोगटातील तीस विद्यार्थ्यांना जेवणासाठी आमंत्रित केले होते. जेवणानंतर काल रात्री विद्यार्थ्यांना उलटी-मळमळ झाल्याने त्यांच्यावर स्थानिक डॉक्टरांमार्फत उपचार सुरू होते. परंतू त्यामधील पाच मुलांची प्रकृती गंभीर होऊन त्यांना आकडी येऊ लागल्याने घाबरलेल्या संस्थेच्या पदाधिकाºयांनी व समाजसेवी लोकांनी बुधवारी रात्री उशीरा एकुण ३० विद्यार्थ्यांपैकी २५ विद्यार्थ्यांना स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रु ग्णालयात दाखल केले. रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.अनिल थोरात यांनी ताबडतोब सर्व विद्यार्थ्यांवर उपचार सुरू केले.परंतू त्यापैकी पाच विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुढील उपचारा करीता डॉक्टरांनी ठाण्यातील सामान्य रूग्णालयांत पाठविले.परंतू दारु ल ऊलुम मदरसा संचालकांनी उरलेल्या सर्व विद्यार्थ्यांना ठाणे येथे पाठविण्याचा निर्णय घेतला. मात्र नंतर त्यांना घेऊन गेलेल्या रूग्णावाहिका परस्पर मुंबई येथील नायर रु ग्णालयात पाठविण्यात आल्या.या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी डॉ संतोष थिटे, तहसीलदार शशिकांत गायकवाड, भाजपा शहराध्यक्ष संतोष शेट्टी, काँग्रेस शहराध्यक्ष शोएब खान गुड्डु व नगरसेवकांनी रु ग्णालयात धाव घेऊन घटनेची माहिती घेऊन सहकार्य केले.या बाबत इंदिरागांधी रूग्णालयांचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.अनिल थोरात यांनी सांगीतले की,सदरच्या विद्यार्थ्यांनी खाल्लेल्या जेवणांत नासके तसेच बुरशीयुक्त अन्नपदार्थ वापरल्याची शक्यता आहे.त्यामधून बोटुलिझम पॉयझन प्रक्रि या होऊन विषबाधा झाल्याची शक्यता वर्तवली आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांना उलट्या,जुलाब,डोके दुखणे,ताप येणे व आकडी येणे असे आजार झाले आहेत. त्यामुळे २४ विद्यार्थ्यांना उपचारासाठी ठाणे सामान्य रूग्णालयांत पाठविले.तर एका विद्यार्थ्यावर इंदिरागांधी रूग्णालयांत उपचार सुरू आहेत.तर नागरिकांच्या सांगण्यानुसार इतर पाच जणांवर शहरातील खाजगी रूग्णालयांत उपचार सुरू आहेत. मात्र ऐनवेळी मदारशांच्या संचालकांनी ठाणे मार्गावर नेलेल्या विद्यार्थ्यांना मुंबईतील रूग्णालयांत नेण्याचा निर्णय कळविला. त्यामुळे सर्व मुले मुंबईतील रूग्णालयात रवाना झाली.या घटनेने शहरात खळबळ माजली असुन या सार्वजनिक कार्यक्रमांत हजारो लोक जेवले असताना केवळ मदारशांमधील मुलांना ही विषबाधा कशी झाली? या बाबत विचारमंथन सुरू झाले असुन याचा शोध घेण्याचा प्रयत्न समाजसेवी लोक घेत आहेत. तसेच काही वर्षापुर्वी शहरातील धोबीतलाव येथे खाणावळीतील जेवणाने अन्न विषबाधा होऊन शेकडो कामगाराचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे.

टॅग्स :Bhiwandiभिवंडीpollutionप्रदूषण