शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
2
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?
3
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
4
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
5
हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी बेकरींना एक वर्षाची मुदतवाढ नाही; १२ बेकरींचा अर्ज फेटाळला
6
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती कोविंद मुख्य अतिथी
7
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
8
असं आहे 'बिग बॉस १९'चं घर! पाहा लिव्हिंग रूमपासून गार्डन एरियापर्यंतचे खास फोटो
9
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
10
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
11
१८ वर्षे असते राहु महादशा, ‘या’ राशींना लॉटरी लागते; श्रीमंती-सुबत्ता लाभते, कल्याणच होते!
12
गणेशभक्तांसाठी राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक १५ किलोमीटरवर सुविधा केंद्र
13
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
14
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
15
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
16
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
17
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
18
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
19
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
20
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील

प्लॅटेनियम रुग्णालय पालिकेने घेतले भाड्याने, दरमहा २० लाखांचा खर्च; भाजपचा विराेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2020 23:33 IST

Ulhasnagar News : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त करीत महापालिकेने शांतीनगर येथील खासगी प्लॅटेनियम रुग्णालय दरमहा २० लाख भाड्याने घेतले आहे.

-  सदानंद नाईक उल्हासनगर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त करीत महापालिकेने शांतीनगर येथील खासगी प्लॅटेनियम रुग्णालय दरमहा २० लाख भाड्याने घेतले आहे. भाजपने खासगी रुग्णालय भाड्याने घेतल्यावर टीका केली असून मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे.उल्हासनगर महापालिकेचे स्वतःचे रुग्णालय नसल्याने कोरोना महामारीत सरकारी प्रसूतीगृह रुग्णालय ताब्यात घेऊन कोविड रुग्णालय उभारले. तसेच सामाजिक संस्थेचे रेड क्रॉस रुग्णालय, कामगार रुग्णालय, महापालिकेची अभ्यासिका, खासगी वेदांत कॉलेज, आयटीआय कॉलेज, तहसील कार्यालयाची नवी इमारत आदी ठिकाणे ताब्यात घेऊन आरोग्य केंद्र उभारले. दरम्यान, कोरोनाची पहिली लाट ओसरल्यावर बहुतांश आरोग्य केंद्र ओस पडली. दरम्यान, कोरोना रुग्णांवर त्वरित उपचार होण्यासाठी महापालिकेच्या टाऊन हॉलमध्ये १०० बेडचे तात्पुरते रुग्णालय उभारले.शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने महापालिकेने उभारलेली अनेक आरोग्य केंद्रे ओस पडली. असे असताना स्थायी समितीत आयत्यावेळी प्लॅटेनियम रुग्णालय भाड्याने घेण्याचा प्रस्ताव प्रशासनाने मांडला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन रुग्णालयासाठी दरमहा २० लाख भाडे देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. दरम्यान, भाजपचे शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी, मनोज लासी आदींनी याला विरोध केला आहे. पालिकेने उभारलेल्या आरोग्य केंद्रात कोरोना रुग्ण नसताना, दरमहा २० लाख रुपये खर्चून रुग्णालय भाड्याने घेण्याचा घाट कुणासाठी, असा प्रश्न केला. यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही पुरस्वानी यांनी केला आहे. 

रुग्णालय वादाच्या भोवऱ्यात?महापालिकेचे तत्कालीन आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या प्रयत्नाने शहरात प्लॅटेनियम हे पहिले खासगी कोविड रुग्णालय उभे राहिले. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. तसेच रुग्णांवर कमी किमतीत उपचार होण्यासाठी १८ लाख रुपये खर्चून ऑक्सिजन पाइपची सुविधा उपलब्ध करून दिली होती. मात्र त्यानंतरही रुग्णांना सुविधा मिळाल्या नसल्याचा आरोप मनसेने केला होता. तेच रुग्णालय महापालिकेने भाड्याने घेतल्याने आरोप-प्रत्यारोप होत आहेत.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरhospitalहॉस्पिटलCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस