शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
3
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
4
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
5
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
6
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
7
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
8
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
9
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
10
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
11
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
12
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
13
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
14
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
15
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
16
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
17
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
18
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
19
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
20
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  

‘प्लेज्ड सेल्फ कमिटमेंट’ शॉर्ट फिल्मला मिळाला पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 02:32 IST

डेहराडून येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये डोंबिवलीतील प्रतीक्षा साबळे-फुलवणे यांच्या ‘प्लेज्ड सेल्फ कमिटमेंट’ या शॉर्ट फिल्मला पुरस्काराने गौरवण्यात आले.

- जान्हवी मोर्येडोंबिवली  - डेहराडून येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये डोंबिवलीतील प्रतीक्षा साबळे-फुलवणे यांच्या ‘प्लेज्ड सेल्फ कमिटमेंट’ या शॉर्ट फिल्मला पुरस्काराने गौरवण्यात आले. या फिल्मला मिळालेला हा तिसरा पुरस्कार आहे.शालेय जीवनात विद्यार्थी दररोज प्रतिज्ञा म्हणतात. परंतु, त्याचा अर्थ त्यांना माहीत नसतो. शिक्षकही त्यांना तो कधी सांगत नाही. प्रतिज्ञेचा अर्थ समजून घेऊन ती आचरणात आणल्यास एक चांगली कुटुंबव्यवस्था आणि पर्यायाने समाज घडायला मदत होईल, अशा आशयाची ‘प्लेज्ड सेल्फ कमिटमेंट’ ही फिल्म आहे. त्यात पाच वर्षांची मुलगी शार्मीन फुलवणे हिने अभिनय केला आहे. या फिल्मला खूप नामांकने आणि तीन पुरस्कार मिळाले आहेत. दिग्दर्शनाचा हा पहिलाच प्रयत्न यशस्वी झाला असल्याने आनंद होत आहे, असे प्रतीक्षा यांनी सांगितले. देशासाठी काही करायला आपल्याकडे वेळ नाही, पैसे नाही, असे आपण बोलतो. पण, ही फिल्म पाहून आपण केवळ मूल्ये सांभाळली तरी खूप आहे, असे मला वाटते. प्रत्येक भारतीयाने ही फिल्म एकदा तरी पाहिली पाहिजे, असे त्या म्हणाल्या.प्रतीक्षा यांनी एक वर्षापूर्वी या फिल्मची निर्मिती केली आहे. फ्लिमचे स्क्रीन प्ले कल्पेश राणे, कॅमेरा रवी धनवे, ध्वनी केतकी चक्रदेव, पोस्टर डिझाइन संकल्प नलावडे, एडिटिंग पराग सावंत, प्रथमेश अवतारे, तर दिग्दर्शन प्रतीक्षा यांनी केले आहे. ही फिल्म इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषांत तयार करण्यात आली आहे.दिल्ली बलात्कार प्रकरण हे सर्व ऐकून मन सुन्न होत होते. म्हणून, समाजात एक चांगला संदेश देण्यासाठी ही शॉर्ट फिल्म तयार केली आहे, असे प्रतीक्षा म्हणाल्या. देशाच्या संरक्षणासाठी सैनिक आपला जीव धोक्यात घालून सीमेवर लढतात. पण, त्यांच्यामागे त्यांचे कुटुंब असते. त्या सैनिकांच्या मुलीने आपल्या आयुष्यात तिरंगा हा प्रथम आपल्या वडिलांच्या अंगावर पाहिला. त्यावेळी तिच्यासाठी त्या तिरंग्यातील तिन्ही रंगांचा अर्थ हा वेगळा असतो. ही फिल्म तीन मिनिटांची असली, तरी खूप काही सांगून जाते. ती मुलगी देशातील लोकांना सांगते की, तुम्ही घरात बसून वाईट कृत्य करून समाजात चुकीचा संदेश पसरवत आहात, हे या फिल्ममधून सांगितल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान, डेहराडून येथील आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये ५५० फिल्म आल्या होत्या. त्यापैकी १७ फिल्मना पुरस्कार देण्यात आले. त्यात ‘प्लेज्ड सेल्फ कमिटमेंट’ ही शॉर्ट फिल्म होती. बॉलिवूडचे चित्रपट दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेता असलेले विवेक वासवाणी यांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा नुकताच पार पडला.ज्योती-सावित्रीलाही पुरस्कारप्रतीक्षा यांना लहानपणापासूनच लिखाणाची खूप आवड होती. त्यामुळे तेच सुरू ठेवावे, अशी त्यांच्या आईची इच्छा होती. परंतु, अभिनयाची आवड असल्याने त्यांनी आपला अभिनयातील प्रवास पुढे सुरू केला. त्यांनी प्रथम ज्योती-सावित्री हे व्यावसायिक नाटक केले. त्याला संस्कृती कलादर्पण पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. याशिवाय, अंगाईगीत चित्रपट तिने केला आहे.

टॅग्स :cinemaसिनेमाdombivaliडोंबिवली