शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

खड्ड्यांनी वाढवली मॅरेथॉन स्पर्धकांची चिंता; सत्ताधाऱ्यांसह प्रशासनाचा मात्र कानाडोळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2019 00:28 IST

ठाणे महापालिकेने आयोजित केलेल्या ३० व्या महापौर मॅरेथॉन स्पर्धेसाठी जवळपास २२ हजार स्पर्धक सज्ज झाले आहेत. यंदा ते स्मार्ट सिटी मॅरेथॉन या घोषवाक्याखाली धावणार आहेत.

ठाणे : ठाणे महापालिकेने आयोजित केलेल्या ३० व्या महापौर मॅरेथॉन स्पर्धेसाठी जवळपास २२ हजार स्पर्धक सज्ज झाले आहेत. यंदा ते स्मार्ट सिटी मॅरेथॉन या घोषवाक्याखाली धावणार आहेत. परंतु, या स्मार्ट सिटीत असलेल्या खड्ड्यांनी त्यांची चिंता मात्र वाढवली आहे. त्याचे कारणही तसेच आहे, काही वर्षांपूर्वी एका स्पर्धकाचा याच खड्ड्यांमुळे पहिला क्रमांक हुकला होता, त्यामुळे आता तशी वेळ पुन्हा त्यांच्यावर येऊन ठेपली आहे. मात्र, याची तमा न करता सारे काही आलबेल असल्याचे सांगून सत्ताधारी शिवसेनेसह प्रशासनाने याकडे वेड्याचे सोंग घेऊन कानाडोळा केला आहे.रविवारी सकाळी ६ वाजता विविध अकरा गटांत तीघेण्यात येणार आहे. यंदा प्रथमच महिलांचीदेखील २१ किमीची स्पर्धा प्रमुख आकर्षण असणार आहे. यंदाही स्पर्धेत टाइम टेक्नॉलॉजीचा वापर २१ किमी पुरुष आणि १५ किमी महिलांच्या गटासाठी करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी एकूण २२१ पंच, ९२ पायलट, २१० सुरक्षारक्षक, शेकडो स्वयंसेवक आणि महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी मेहनत घेत आहेत.स्पर्धेसाठी महापालिकेने विविध सेवा उपलब्ध करून दिल्या असून त्यामध्ये स्पर्धकांची विनामूल्य वैद्यकीय तपासणी, तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आपत्कालीन सेवापथके, तत्काळ वैद्यकीय सेवा, प्रशिक्षित डॉक्टर व परिचारिकांसह रु ग्णवाहिका, स्पर्धेच्या मार्गांवर विविध टप्प्यांवर प्राथमिक उपचारकेंद्रे असणार आहेत. याशिवाय, स्पर्धकांसाठी ठाणे परिवहनसेवेचीमोफत बससेवेची सुविधा उपलब्ध केली आहे.गेल्याकाही दिवसांपासून मॅरेथॉनच्या मार्गांवरील खड्डे बुजविण्याच्या मोहिमेला वेगही आला आहे. परंतु वारंवार कोसळत असलेल्या पावसाने ते पुन्हा उखडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळेच खड्डे हाच मोठा अडथळा या स्पर्धेसाठी निर्माण झाला आहे. काही ठिकाणी सिमेंट तर काही ठिकाणी डांबर टाकून तात्पुरत्या स्वरूपात मुलामा मारण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, अधूनमधून जोरदार बरसणाºया सरींमुळे या मार्गावर पुन्हा खड्डे दिसत आहेत. शिवाय, मॅरेथॉनचा शेवट ज्या ठिकाणी होणार आहे, त्याठिकाणीसुद्धा पालिकेने एक दिवस रस्ता बंद ठेवून तेथील खड्डे बुजविले होते. परंतु, पावसाने पुन्हा या रस्त्याची चाळण केली आहे. दरम्यान, तीन वर्षांपूर्वी याच खड्ड्यांमुळे एका स्पर्धकाचा पहिला क्रमांक हुकला होता.

टॅग्स :Marathonमॅरेथॉन