शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-शीळ रस्त्यावरील खड्डे तत्काळ बुजवावे, आमदार प्रमोद पाटील यांचे महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाला पत्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2020 14:16 IST

कल्याण-शीळ रस्ता हा ठाणे,नवी मुंबई कल्याण,डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर येथील प्रवाशांसाठी मुख्य रस्ता आहे. रोज हजारो वाहने या रस्त्यावरून जात-येत असतात. सध्या लॉकडाऊन मुळे सर्वसामान्य प्रवाशांसाठी रेल्वे सेवा बंद आहे.

डोंबिवली - सध्या कल्याण-शीळ महामार्गावर रस्त्याच्या रुंदीकरण आणि सिमेंट काँक्रीटीकरण काम सुरू आहे. बहुतांश ठिकाणी रस्त्याचे खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे वाहनांसाठी काही ठिकाणी सिंगल लेन रस्ता उपलब्ध आहे. परंतु सध्या रस्त्याची परिस्थिती पाहिली तर जागोजागी मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यात पावसाळा सुरू असल्याने प्रवाशांच्या अडचणीत अधिकच भर पडत असून, अपघातही वाढले असल्याने पुन्हा एकदा खड्याचे बळी जाऊ नयेत यासाठी तातडीने या म्हहामार्गावरील खड्डे बुजवावेत, अशी मागणी आमदार प्रमोद पाटील यांनी एमएसआरडीसीच्या कार्यकारी अभियंत्यांना शुक्रवारी पत्राद्वारे केली.कल्याण-शीळ रस्ता हा ठाणे,नवी मुंबई कल्याण,डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर येथील प्रवाशांसाठी मुख्य रस्ता आहे. रोज हजारो वाहने या रस्त्यावरून जात-येत असतात. सध्या लॉकडाऊन मुळे सर्वसामान्य प्रवाशांसाठी रेल्वे सेवा बंद आहे, अशावेळी वरील सर्व परिससरात राहणाऱ्या नागरिकांना कल्याण-शीळ रस्त्यावरून वाहनाने प्रवास करण्याशिवाय कोणताही अन्य पर्याय उपलब्ध नाही. तरी त्या रस्त्याची परिस्थिती पाहता, या रस्त्यावरील खड्डे ताबडतोब बुजविण्याचे काम हाती घ्यावे, तसेच केलेल्या कार्यवाहीची तातडीने लेखी माहिती उपलब्ध करून द्यावी, असेही त्यांनी पत्रात म्हंटले आहे.  एमएसआरडीसीच्या अभियंत्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या त्या रस्त्याचे सीसी काम सुरू असून पावसामुळे ते संथगतीने पुढे सरकत आहे. 21 मीटर लांबीच्या स्त्यामध्ये एकूण 8 लाईन्स पैकी 2 लाईन्सचे सुमारे 18 किमीपर्यंत सीसी काम।झाले आहे. बाकी लाईन्सचे काम आगामी काळात हाती घेण्यात येणार आहे. तसेच लॉकडाऊनमुळे चार महिने कामगारांच्या उपलब्धतेची समस्या होती, ती आता हळूहळू पुढे सुटत असून लवकरच त्या रस्त्यावरील प्रलंबित कामाना वेग मिळेल. पत्री पूल दरम्यान असलेले।खड्डे चिखल।खड्यानी बुजवण्यात येत असून त्या बद्दल आमदार पाटील यांनी नाराजी व्यक्त।केली. ही थुकपट्टीची कामे असून योग्य नसल्याचे ते म्हणाले. अभियंत्यावर कोणाचाही वचक राहिलेला नाही, सब घोडे 12 टके अशी टीकाही त्यांनी केली. 

टॅग्स :thaneठाणेdombivaliडोंबिवली