शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
5
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
6
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
7
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
8
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
9
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
10
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
11
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
12
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
13
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
14
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
15
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
16
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

‘पितांबरी’ची आग शॉर्टसर्किटमुळे

By admin | Updated: February 21, 2017 03:51 IST

भिवंडी तालुक्यातील सुपे-अनगाव येथील पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा.लि.च्या अगरबत्तीनिर्मिती कारखान्याला रविवारी लागलेली

ठाणे : भिवंडी तालुक्यातील सुपे-अनगाव येथील पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा.लि.च्या अगरबत्तीनिर्मिती कारखान्याला रविवारी लागलेली आग विद्युतपुरवठ्यातील शॉर्टसर्किट व हवेतील तापमानवाढ या दोन्ही कारणांमुळे लागली असावी, असा प्राथमिक अंदाज कंपनीने वर्तवला आहे. आगीसाठी कुणावरही संशय नसल्याचे व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे. कंपनीने आगप्रतिबंधक यंत्रणा उपलब्ध केली असून साप्ताहिक सुटी असल्याने व अग्निशामक दलाचे बंब वेळेवर पोहोचू न शकल्याने आग वेळेत आटोक्यात आणणे शक्य झाले नाही, असे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांनी स्पष्ट केले आहे.प्रभुदेसाई म्हणतात की, आगीच्या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही. परंतु, अगरबत्तीच्या पॅकिंगसाठी लागणारे साहित्य, कार्यालयीन कागदपत्रे व संगणक यंत्रणा पूर्णपणे भस्मसात झाली आहे. आगीमुळे झालेले नुकसान साधारणत: एक ते दीड कोटीच्या घरात जाईल, असा प्राथमिक अंदाज आहे. याच ठिकाणी पितांबरीच्या फूडकेअर डिव्हिजनचा कारखाना, पितांबरी टिश्यू कल्चरसाठी उभारण्यात आलेले ग्रीनहाउस, गोशाळा आदी उपक्रम चालतात. परंतु, यापैकी कशाचेही आगीमुळे नुकसान झालेले नाही. आगीचे वृत्त समजताच पितांबरीचे संचालक व अ‍ॅग्रीकेअर आणि अगरबत्ती डिव्हिजनचे व्हाइस प्रेसिडेंट परीक्षित प्रभुदेसाई व चीफ मार्केटिंग आॅफिसर माधव पुजारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्यात सहभाग घेतला. येत्या एक ते दोन महिन्यांत कारखाना पूर्ववत सुरू करण्यात येईल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)