शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमध्ये खड्ड्याचा बळी; पत्रीपुलावरील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 02:23 IST

ट्रकची रिक्षा आणि दोन दुचाकींना धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू , तर अन्य एक जखमी

कल्याण : पत्रीपुलावर होणारी प्रचंड कोंडी आणि खड्डे आता चालकांच्या जीवावर बेतू लागला आहे. शुक्रवारी सकाळी पूर्वेकडून पत्रीपूलमार्गे पश्चिमेला जाणाऱ्या एका ट्रकने रिक्षा आणि दोन दुचाकींना दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वार अरुण महाजन यांचा मृत्यू झाला, तर विलास रेडकर हे अन्य दुचाकीचालक जखमी झाल्याची घटना घडली आहे. खड्ड्यांमुळे हा अपघात झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.ब्रिटिशकालीन पत्रीपूल धोकादायक बनल्याने तो नोव्हेंबरमध्ये पाडण्यात आला. तेव्हापासून शेजारी केडीएमसीने बांधलेल्या पुलावरून दोन्ही बाजूंकडील वाहतूक सुरू आहे. त्यामुळे पत्रीपुलावर सातत्याने प्रचंड वाहतूककोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागत आहे. तसेच, खड्डे चुकवताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत असून हेच खड्डे शुक्रवारी महाजन यांच्या जीवावर बेतल्याचे बोलले जात आहे.पत्रीपुलावरून पश्चिमेकडे जाणाºया ट्रकचालकाचा ताबा सुटल्याने ट्रकने रहेजा कॉम्प्लेक्ससमोर रोडवर एका रिक्षासह दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. या अपघातात महाजन यांचा जागीच मृत्यू झाला, तर रेडक र हे जखमी झाले. यात रिक्षाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.पत्रीपुलावरून पश्चिमेकडे येताना रस्त्याला उतार असून खड्डे असल्याने दुचाकीस्वारांनी ते वाचवण्यासाठी वेग कमी केला आणि त्याचवेळी पाठीमागून आलेल्या वेगातील ट्रकची धडक बसल्याचा आरोप होत आहे. जखमी रेडकर यांनीही खड्डे चुकवताना अपघात झाल्याचा आरोप आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेले महाजन हे पश्चिमेतील बेतुरकरपाडा येथे वास्तव्याला होते. ते डोंबिवली एमआयडीसीतील खाजगी कंपनीत कामाला होते. रात्रपाळी करून सकाळी दुचाकीवरून ते घरी परतत होते. त्यावेळी गाडीला अपघात होऊन त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर रेडकर यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. त्यांच्या हाताला चार टाके पडले आहेत. रेडकर हे डोंबिवलीतील एमआयडीसी विभागात राहतात. अपघातास कारणीभूत असलेला ट्रकचालक नदीम शेख याला महात्मा फुले चौक पोलिसांनी अटक केली आहे.पुलाचे काम कधी मार्गी लागणार?ब्रिटिशकालीन पत्रीपूल पाडल्यानंतर नवीन पुलाच्या कामाचे डिसेंबर २०१८ मध्ये भूमिपूजन करण्यात आले. नवीन पुलाचे काम आठ महिन्यांत पूर्ण होईल, असा दावा सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता. परंतु, आजघडीला सात महिने उलटूनही काम संथगतीनेच सुरू आहे. मागील वर्षी कल्याणमधील खड्ड्यांनी पाच जणांचा बळी घेतला होता. शुक्रवारी घडलेल्या घटनेनंतर तरी संबंधित विभागाला जाग येते का, याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Potholeखड्डेAccidentअपघात