शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात शिरताना जरा जपून; प्रवेशालाच धोका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2018 09:36 IST

प्रवेशद्वाराच्या कमानीचा काही भाग कोसळण्याच्या स्थितीत

ठाणे: शहराचं प्रवेशद्वारच धोकादायक स्थितीत असल्यानं वाहन चालकांवर जीव मुठीत धरुन प्रवास करण्याची वेळ आली आहे. याशिवाय पादचाऱ्यांच्या जीवालादेखील धोका निर्माण झाला आहे. लाल बहादूर शास्त्री मार्गावरील ठाणे महापालिकेच्या प्रवेशद्वाराच्या कमानीचा काही भाग कोसळण्याच्या स्थितीत आहे. याआधी अनेकदा कमानीचं प्लास्टर कोसळण्याच्या घटना घडूनही अद्याप ठाणे महापालिकेला जाग आलेली नाही.लाल बहादूर शास्त्री मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार आहे. मात्र या प्रवेशद्वाराची सध्या दुरवस्था झाली आहे. प्लास्टरचे तुकडे खाली पडत असल्यानं या भागातून जाणाऱ्या वाहनांना आणि पादचाऱ्यांना धोका आहे. गेल्याच आठवड्यात ईशान्य मुंबईचे माजी खासदार संजय दिना पाटील यांनी याबद्दल ठाणे महापालिकेला पत्र लिहिलं. महापौर मिनाक्षी शिंदे या प्रकरणात लक्ष घालून तातडीनं प्रवेशद्वाराची दुरुस्ती करावी, अशी मागणी पाटील यांनी केली. 'छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराच्या कमानीचा काही भाग कधीही कोसळू शकतो. या प्रवेशद्वाराच्या दुरुस्तीसाठी मी ठाण्याच्या महापौरांना पत्र लिहिलं आहे,' असं पाटील यांनी सांगितलं. दहा दिवसांपूर्वी कमानीचं प्लास्टर पडून एका कारची काच फुटली, अशी माहिती प्रवेशद्वाराजवळ कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांनी दिली. मात्र कार चालकानं कोणतीही तक्रार दाखल केली नाही, असंही त्यांनी सांगितलं. ठाणे महापालिकेकडे याबद्दलची तक्रार पोहोचल्यावर शनिवारी महापौर मिनाक्षी शिंदेंनी प्रवेशद्वाराची पाहणी केली. 'प्रवेशद्वाराच्या कमानीचा काही भाग कोसळण्याच्या स्थितीत असल्याची माहिती खरी आहे. कमानीचं प्लास्टर कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. आम्ही लवकरच कमानीची दुरुस्ती करु,' असं आश्वासन शिंदे यांनी दिलं.  

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका