शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

मल्टिप्लेक्सच्या समोशात आढळला कापडाचा तुकडा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 00:11 IST

पश्चिमेकडील भागात असलेल्या मॉलमधील ‘एसएम ५’ या मल्टिप्लेक्स सिनेमागृहातील समोशात कापडाचा तुकडा आढळल्याने येथील खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

कल्याण - पश्चिमेकडील भागात असलेल्या मॉलमधील ‘एसएम ५’ या मल्टिप्लेक्स सिनेमागृहातील समोशात कापडाचा तुकडा आढळल्याने येथील खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या प्रकारानंतर मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी मल्टिप्लेक्स गाठत समोसा बनवणा-याला ‘खळ्ळ खट्याक’चा दणका दिला. दरम्यान, याठिकाणी खाद्यपदार्थांची चढ्या दरानेच विक्री होत सुरू असल्याचे उघड झाले आहे.मल्टिप्लेक्समध्ये प्रतिमा खरात शुक्रवारी सकाळी मैत्रिणीसोबत चित्रपट पाहण्यासाठी आल्या होत्या. चित्रपटाच्या मध्यंतरात त्यांनी मल्टिप्लेक्समधील स्टॉलवरून तब्बल ९० रु पये देऊन दोन समोसे विकत घेतले. त्यातील एक समोसा त्यांनी खाल्ला, तर दुसरा समोसा खात असतानाच त्यांना त्यामध्ये कापडाचा मोठा तुकडा आढळल्याने त्यांना धक्काच बसला. ते पाहून त्यांला उलटीही झाली. याप्रकरणी त्यांनी मल्टिप्लेक्स व्यवस्थापनाला जाब विचारला आणि आपल्या नातेवाइकांना फोन करून बोलावले. हा प्रकार मनसे महिला शहर अध्यक्ष शीतल विखणकर यांना समजताच त्यांनीही अन्य कार्यकर्त्यांसह मल्टिप्लेक्स गाठत व्यवस्थापनाला धारेवर धरले.समोसा बनविणाºयाच्या कानशिलातही लगावून कापड मिळालेला समोसा त्याच्या तोंडात कोंबण्याचा प्रयत्न केला. व्यवस्थापनाने खरात यांची माफी मागत पुन्हा असा प्रकार घडणार नसल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांसमोर सांगितले. याप्रकरणी एमएफसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती विखणकर यांनी ‘लोकमत’ला दिली.चढ्या दराने विक्री सुरूचबाहेर मिळणा-या १० रुपयांच्या समोशासाठी ४५ रुपये आकारले जातात हेहीया घटनेतून समोर आले आहे. काही महिन्यांपूर्वी मनसेने मॉलमध्ये खाद्यपदार्थांची चढ्या दराने होत असलेल्या विक्रीविरोधात आंदोलन केले होते. पण चढ्या दराने आजही विक्री सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान मल्टिप्लेक्समधील महागडे खाद्यपदार्थ आणि त्यांच्या दर्जाबाबत या घटनेने पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

टॅग्स :kalyanकल्याणfoodअन्न