शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

तिसऱ्या टप्प्याची निविदा लवकरच; रिंगरोड प्रकल्पाबाबत खासदारांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 23:31 IST

दुर्गाडी ते मोठागाव ठाकुर्लीदरम्यान ८० टक्के जागा संपादित

कल्याण : कल्याण-डोंबिवलीतील वाहतूककोंडीवर उतारा ठरणाºया रिंगरोड प्रकल्पाचे दुर्गाडी ते टिटवाळा या टप्प्यातील कामांनी चांगल्या प्रकारे गती घेतली आहे. त्यामुळे दुर्गाडी ते मोठागाव ठाकुर्लीदरम्यानच्या तिसºया टप्प्याची निविदा लवकरच काढण्यात येणार आहे, अशी माहिती कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गुरुवारी दिली.केडीएमसी आयुक्त गोविंद बोडके आणि एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांसोबत डॉ. शिंदे यांची गुरुवारी बैठक झाली. त्यानंतर, ते बोलत होते. याप्रसंगी महापौर विनिता राणे, शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, सभागृह नेते श्रेयस समेळ, माजी महापौर राजेंद्र देवळेकर, स्थायीचे माजी सभापती दीपेश म्हात्रे, शिवसेना नगरसेवक विश्वनाथ राणे आदी मान्यवर उपस्थित होते.रिंगरोडचे काम सात टप्प्यांत केले जाणार आहे. त्यापैकी चार, पाच, सहा आणि सात या चार टप्प्यांचे दुर्गाडी ते टिटवाळा, असे १७ किलोमीटर अंतराचे काम प्रगतीपथावर आहे. या कामात भूसंपादनाचे अडथळे असल्याने कामाला गती नव्हती. दुर्गाडी ते टिटवाळा या मार्गात जवळपास ७० टक्के भूसंपादन प्रक्रिया पार पडल्याने कामाला गती मिळाली आहे. हा टप्पा मे-जून २०२० मध्ये पूर्ण करता येऊ शकतो. दुर्गाडी ते मोठागाव ठाकुर्ली या तिसºया टप्प्यासाठी ८० टक्के जागा संपादित केली आहे. त्यामुळे या टप्प्याच्या कामाची निविदा तातडीने प्रसिद्ध करावी, अशी मागणी एमएमआरडीएचे मुख्य आयुक्त राजीव यांच्याकडे केली आहे, असे डॉ. शिंदे म्हणाले.कल्याण-शीळ ते मोठागाव ठाकुर्ली हा प्रकल्पाचा दुसरा टप्पा असून, त्यासाठी एमएमआरडीएने ड्रोनद्वारे सर्वेक्षण केले आहे. या कामात काय अडचणी येतात, त्याचा आढावा घेतला आहे. पहिला टप्पा कल्याण ग्रोथ सेंटरच्या हद्दीतील आहे. तर, रिंगरोडमध्ये ९० फुटी रस्त्यापासून ठाकुर्लीपर्यंत उड्डाणपूल प्रस्तावित आहे. २४ मीटर रुंदीचा पुलाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येणार असून, त्यासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद केली आहे. प्रकल्पाच्या दुसºया व तिसºया टप्प्यांचे काम झाल्यास कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहतुकीचा ताण आपोआपच कमी होण्यास मदत होईल. त्याचबरोबर रिंगरोड प्रकल्पातील रेल्वेमार्गावरील व अन्य ठिकाणच्या रोड जंक्शनवर उड्डाणपूल प्रस्तावित केले आहेत, असेही डॉ. शिंदे यांनी सांगितले.लोकग्राम पादचारी पुलासंदर्भात सोमवारी पाहणीकल्याण रेल्वेस्थानकातील लोकग्राम पादचारी पूल हा रेल्वेने वापरासाठी बंद केला आहे. त्यामुळे पादचारी व प्रवाशांची गैरसोय होत आहे. या पुलाचा खर्च ७९ कोटी रुपये रेल्वेने सांगितला होता. मात्र, स्मार्ट सिटी प्रकल्पातील रेल्वेस्टेशन परिसराच्या विकासांतर्गत ३९ कोटी रुपये देण्याचे महापालिकेने ३० डिसेंबरच्या बैठकीत मंजूर केले आहे.नवीन पूल सध्याचा लोकग्राम पादचारी पूल आहे तेथेच बांधायचा की, आहे त्या पुलाला समांतर बांधायचा, असा प्रश्न आहे. सध्याचा पूल तोडून नवीन बांधण्यास बराच वेळ लागेल. त्यापेक्षा आहे तो पूल एकीकडे तोडायचा आणि त्याचवेळी दुसºया बाजूला नवा पादचारी पूल उभारल्यास अधिक सोयीचे होईल, असा मुद्दा रेल्वेच्या निदर्शनास आणून दिला आहे.परंतु, तेथे रेल्वेची एक केबिन आहे. तसेच पादचारी पुलाचा भाग हा रेल्वे यार्डातून जात आहे. तेथे रेल्वेची सिग्नल यंत्रणा व काही केबल आहेत. हे सगळे स्थलांतरित करावे लागणार आहे. त्यासाठी महापालिका आयुक्त व रेल्वेच्या अधिकारी व स्मार्ट सिटीचे पदाधिकारी व संचालक मंडळातील संचालक यांच्यासमवेत सोमवारी, ६ जानेवारीला संयुक्त पाहणी दौरा केला जाणार असल्याची माहिती डॉ. शिंदे यांनी दिली.कोपर उड्डाणपुलासाठी निविदा प्रसिद्धडोंबिवली कोपर दिशेकडील रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी महापालिकेने आठ कोटी ९२ लाख रुपये खर्चाची निविदा गुरुवारी प्रसिद्ध केली आहे. ही निविदा भरण्याचा कालावधी २५ जानेवारीपर्यंत आहे. त्यानंतर, त्याला प्रतिसाद मिळाल्यावर ती उघडली जाईल.दरम्यान, रेल्वे पादचारी पुलासंदर्भात नुकतीच रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांकडे बैठक झाली होती. रेल्वेच्या सुरक्षा आयुक्तांकडे पूल पाडण्याची परवानगी मागितली असून २५ जानेवारीपर्यंत परवानगी मिळणे अपेक्षित असल्याकडे डॉ. शिंदे यांनी लक्ष वेधले.कोपर पुलाचा अर्धा खर्च उचलावा, असा प्रस्ताव महापालिकेने रेल्वेकडे पाठवला होता. मात्र, त्यावर रेल्वेकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे रेल्वेवर विसंबून न राहता नागरिकांच्या सोयीसाठी जानेवारीतील महासभेत पुलाच्या कामासाठी खर्चाची तरतूद करण्यासाठी मंजुरी दिली गेली. तेव्हा महापौरांनी तातडीने निविदा काढण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यानुसार, निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.खर्चाचा घोळ कायम- मनसेकोपर पुलाची निविदा प्रसिद्ध होताच मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकली आहे. पुलाच्या कामासंदर्भात मनसेचे आमदार राजू पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर, महापालिकेने तातडीने निविदा प्रसिद्ध केली आहे. मात्र, खर्चाचा घोळ कायम ठेवला आहे, असे त्यांनी त्यात म्हटले आहे.