ऑनलाइन लोकमत
भिवंडी, दि. 22 - आपल्या पत्नीची हत्या करुन नंतर तिचे स्तन कापून टाकण्यात आल्याची विकृत आणि तितकीच धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पतीला आपल्या पत्नीचे दुस-या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. त्यामुळेच या विकृत पतीने पत्नीची हत्या केल्यानंतर स्तन कापून टाकले आहेत. भिवंडीमध्ये ही घटना घडली आहे.
22 वर्षीय आकोपी एजाजचं आणि 21 वर्षीय शमीना (दोघांची नावे बदलण्यात आली आहेत) यांचं लग्न झालं होतं. हे दांपत्य नारपोली परिसरात राहत होतं. शनिवारी रात्री ही घटना घडल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. एजाज आणि शमीना यांच्यामध्ये विवाहबाह्य संबंधांवरुन जोरदार भांडण झालं. यामध्ये दोघांनी एकमेकांना मारहाणही सुरुही केली होती. याचवेळी एजाजने शमीनाची हत्या केली. हत्येनंतर एजाजने पोलिसांनी स्वत: फोन करुन घटनेची माहिती दिली. मात्र त्याने शमीनाचा वरुन खाली पडल्याने मृत्यू झाल्याची खोटी माहिती पोलिसांना दिली होती.
पोस्टमॉर्टम केल्यानंतर शमीनावर चाकूने वार केल्याचं समोर आलं. तसंच स्तन कापून वेगळे केल्याचीही माहिती समोर आली. यानंतर एजाजची कसून चौकशी करण्यात आली. अखेर त्याने पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला.