शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नाट्यजल्लोषच्या सहाव्या पर्वात लोक वस्तीतील कलाकार कार्यकर्ते सादर करणार, "मनोविकास" संबंधी नाटिका!*

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 17:15 IST

नाट्य जल्लोषच्या सहाव्या पर्वात येत्या शनिवार - रविवारी लोक वस्तीतील कलाकार "मनोविकास" संबंधी नाटिका कार्यकर्ते सादर करणार आहेत.

ठळक मुद्देनाट्यजल्लोषच्या सहाव्या पर्वात लोक वस्तीतील कलाकार कार्यकर्ते सादर करणार, "मनोविकास" संबंधी नाटिका!*टॅग व आयपीएचच्या सहका-यांचे मार्गदर्शन१३ नाटिकांमधून सहा नाटिका पहिल्या फेरीत

ठाणे : वंचितांचा रंगमंच अर्थात नाट्यजल्लोषच्या सहाव्या पर्वात, येत्या शनिवार व रविवारी १ व २ जून रोजी सायं. ५ ते ८ यावेळात ठाण्यात मनोविकास या थीमवर तेरा वस्त्यांमधील कार्यकर्ते कलाकार स्वरचित नाटिका सादर करणार असल्याची माहिती समता विचार प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डाॅ. संजय मंगला गोपाळ, बाल नाट्य संस्थेच्या प्रतिभा मतकरी व संयोजक हर्षदा बोरकर यांनी एका संयुक्त पत्रकाद्वारे  कळविले आहे. 

     पत्रकात ते पुढे म्हणतात, वंचितांचा रंगमंच अर्थात नाट्य जल्लोष म्हणजे लोकवस्तीतल्या संवेदनशील कार्यकर्त्याला प्रामाणिकपणे व्यक्त होण्याची संधी आहे. एक चांगला, वेगळा व जबाबदार नागरिक घडविणे, हे या चळवळीचे ध्येय आहे. शरीराच्या सुयोग्य वाढीसाठी व सुंदर दिसण्यासाठी आपण धडपडतो तितकेच महत्व, मनाला सुंदर बनवण्यासाठी धडपडण्याला देणे म्हणजे मनोविकास. म्हणूनच यंदा इन्स्टिट्यूट फाॅर सायकाॅलाॅजिकल हेल्थ अर्थात आयपीएच चे प्रमुख व प्रसिद्ध साहित्यिक, नाटककार डाॅ. आनंद नाडकर्णी यांच्या पुढाकाराने मनोविकास ही थीम नाट्यजल्लोष साठी निवडण्यात आली आहे. गेले चार महिने नाट्य, मनोविकास, लेखन, दिग्दर्शन, अभिनय अशा विविध पैलूंवर डाॅ. आनंद नाडकर्णी, प्रसिद्ध दिग्दर्शक विजू माने, आयपीएचच्या वैदेही भिडे, शुभांगी दातार, संवेदनशील लेखिका, नृत्यांगना व नाट्यजल्लोषच्या संयोजक हर्षदा बोरकर आदींच्या मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या होत्या. १ व २ जूनला होणा-या या जल्लोषाच्या वेळी प्रसिद्ध रंगकर्मी मा. रत्नाकर मतकरी, नाट्यकर्मी उदय सबनीस, विजू माने, संतोष पाठारे, मेघना जाधव तसेच सामाजिक चळवळीतील वंदना शिंदे, प्रदीप इंदुलकर, सुरेंद्र दिघे, मयुरेश भडसावळे व अन्य मान्यवर उपस्थित रहाणार आहेत. ठाण्यातील पाचपाखाडी परिसरात गोदुताई परूळेकर उद्यानात होत असलेल्या या कार्यक्रमाला ठाणे, मुंबई परिसरातील सर्व संवेेेदनशील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने साथी जगदीश खैरालिया, मनिषा जोशी, हर्षलता कदम, लतिका सु., मो., सुनील दिवेकर, अजय भोसले, निलेश दंत यांनी केले आहे. 

 

  *टॅग व आयपीएच च्या सहका-यांचे मार्गदर्शन*  

         समता विचार प्रसारक संस्था व बालनाट्य संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने, ज्येष्ठ व संवेदनशील साहित्यिक रंगकर्मी रत्नाकर मतकरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम गेली पाच वर्षे ठाण्यात एकलव्यांसाठी  सुरू आहे. नाट्य जल्लोषच्या ६ व्या पर्वात चिराग नगर, सावरकर नगर, मनोरमा नगर, शिवाजीनगर, माजिवडा, राम नगर, मानपाडा, भिवंडी, घणसोली आदी लोकवस्त्यांमधून मनोविकास या थीमअंतर्गत - कुटुंबातील संशयकल्लोळ, एखाद्या गोष्टीचा अतिरेकी आग्रह (ऑबसेशन), मोबाइलचा विळखा, सोशल मिडीया, पालक - बालक सुसंवाद, अंधश्रद्धा अशा विविध विषयांवर तेरा नाटिका सादर होणार आहेत. आयपीएच चे तज्ञ डाॅ. सुुुुरभी नाईक, डाॅ. सतीश नागरगोजे, सुलभा सुब्रमण्यम, डाॅ. स्वप्निल पांगे आदींच्या मार्गदर्शनाखाली या नाटिकांच्या संहिता लोकवस्तीतल्या मुली - मुलांनी स्वतः विकसित केल्या आहेत. या नाटिका बसवण्यासाठी विविध गटांना ठाणे आर्ट गिल्ड - टॅगचे कलाकार निलिमा सबनीस, रुपाली खैरनार, प्राची दुबे, राधिका भालेराव, मिताली, योगेश, वर्षा आदी सरावाच्या ठिकाणी जाऊन मदत करीत आहेत. या नाटिकांचे लेखन, दिग्दर्शन, संयोजनात विश्वनाथ चांदोरकर, भारती पाटणकर, निशीगंधा चुडजी, अनुजा लोहार, लता देशमुख, संदीप जाधव, इनाॅक कोलियार, आतेश शिंदे, दिपक वाडेकर, ओंकार जंगम आदी कसून मेहनत घेत आहेत. या १३ नाटिकांमधून सहा नाटिका पहिल्या फेरीत निवडून त्यांचे सादरीकरण साने गुरूजी स्मृती दिना निमित्त रविवार, दि. ९ जूनला ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे होणार आहे. 

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईcultureसांस्कृतिक