नाट्यजल्लोष म्हणजे लोक वस्तीतील मुलांना प्रामाणिक पणे व्यक्त होण्याची संधी! - विजू माने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 04:06 PM2019-05-09T16:06:04+5:302019-05-09T16:11:06+5:30

वंचितांचा रंगमंच अर्थात नाट्य जल्लोष म्हणजे लोक वस्तीतील मुली मुलांना प्रामाणिकपणे व्यक्त होण्याची संधी! असे प्रतिपादन विजू माने यांनी केले.

Natyajlalash is the opportunity for people to express themselves honestly! - Viju Mane | नाट्यजल्लोष म्हणजे लोक वस्तीतील मुलांना प्रामाणिक पणे व्यक्त होण्याची संधी! - विजू माने

नाट्यजल्लोष म्हणजे लोक वस्तीतील मुलांना प्रामाणिक पणे व्यक्त होण्याची संधी! - विजू माने

Next
ठळक मुद्देनाट्यजल्लोष म्हणजे लोक वस्तीतील मुलांना प्रामाणिक पणे व्यक्त होण्याची संधी! - विजू माने मनोविकास या थीमवर होणार १४ नाटिका सादर! समता विचार प्रसारक संस्था व बालनाट्य संस्था आयोजित नाट्यजल्लोष

ठाणे : "वंचितांचा रंगमंच अर्थात नाट्य जल्लोष म्हणजे स्पर्धा किंवा प्रथम कोण हे ठरवण्याची चढाओढ नसून लोकवस्तीतल्या संवेदनशील कार्यकर्त्याला प्रामाणिकपणे व्यक्त होण्याची संधी आहे. आपली स्पर्धा इतरांशी नसून स्वतःशी आहे. स्टार बनणे हे आपले उद्दीष्ट नसून एक चांगला, वेगळा व जबाबदार नागरिक घडविणे, हे या चळवळीचे ध्येय आहे. आपण कौतुकासाठी नाही तर प्रामाणिक  व प्रभावी अभिव्यक्ती व सादरीकरण यासाठी धडपडतो आहोत", अशा शब्दांत दिग्दर्शक व टॅगचे सचिव विजू माने यांनी एकलव्य कलाकार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. 

         समता विचार प्रसारक संस्था व बालनाट्य संस्था आयोजित नाट्यजल्लोषच्या अभिनय कार्यशाळेत ते बोलत होते. "शरीराच्या सुयोग्य वाढीसाठी व सुंदर दिसण्यासाठी आपण धडपडतो तितकेच महत्व, मनाला सुंदर बनवण्यासाठी धडपडण्याला देणे म्हणजे मनोविकास, असं त्यांनी पुढे बोलतांना स्पष्ट केलं. अध्यक्षस्थानी संवेदनशील लेखिका, नृत्यांगना व नाट्यजल्लोषच्या संयोजक हर्षदा बोरकर होत्या. या कार्यशाळेत विजू माने यांनी आगामी नाट्यजल्लोषच्या कलाकारांना अभिनय व दिग्दर्शनाचे मौलिक मार्गदर्शन केले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व समता विचार प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डाॅ. संजय मंगला गोपाळ यांनी, या १४ नाटिकांचा जल्लोष पुढील महिन्याच्या सुरूवातीस होणार असून यातील सहा नाटिका पहिल्या फेरीत निवडून त्यांचे सादरीकरण साने गुरूजी स्मृती दिना निमित्त रविवार, ९ जूनला गडकरी रंगायतन येथे होणार असल्याचे यावेळी जाहीर केले. कोणत्याही साधनांसाठी अडून न रहाता, कल्पनाशक्तीचा वापर करून आपण रंगमंचावर हवे ते विश्व उभारण्याची किमया साधू शकतो, असं हर्षदा बोरकर म्हणाल्या. 

            या कार्यशाळेत चिराग नगर, सावरकर नगर, मनोरमा नगर, शिवाजीनगर, माजिवडा, राम नगर, घणसोली, भिवंडी आदी लोकवस्त्यांमधून नाटिका सादर करणा-या कार्यकर्त्यांचा सहभाग होता. नाट्य जल्लोषच्या ६ व्या पर्वाची तयारी जोरात सुरू झाली असून गेले तीन महिने, ठाण्यातील विविध लोकवस्त्यांमधील युवा, बाल व महिला कलाकार कार्यकर्ते यासाठी कसून सराव आणि मान्यवरांचे मार्गदर्शन मिळवत आहेत. मनोविकास या थीमवर अंतर्गत - कुटुंबातील संशयकल्लोळ, एखाद्या गोष्टीचा अतिरेकी आग्रह (ऑबसेशन), मोबाइलचा विळखा, सोशल मिडीया, पालक - बालक सुसंवाद, अंधश्रद्धा अशा विविध विषयांवर नाटिका सादर होणार आहेत. ठाण्यातील ज्येष्ठ नाटककार, साहित्यिक व मनोविकास तज्ञ आयपीएच संस्थेचे डाॅ. आनंद नाडकर्णी व त्यांचे सहकारी वैदेही भिडे, शुभांगी दातार, सुरभी नाईक, डाॅ. सतीश आदींच्या मार्गदर्शनाखाली या नाटिकांच्या संहिता लोकवस्तीतल्या मुली - मुलांनी स्वतः विकसित केल्या आहेत. या नाटिका व त्यांचे गट बांधण्यासाठी संस्थेच्या हर्षलता कदम, लतिका सु. मो., निलीमा सबनीस, मनिषा जोशी, मानसी जोशी, सुनिल दिवेकर, भारती पाटणकर, विश्वनाथ चांदोरकर, अजय भोसले, अनुजा लोहार, आतेेेश शिंदे, इनाॅक कोलियार, चेतन दिवे, लता देशमुख, संदिप जाधव, ओंकार जंगम, दीपक वाडकर, सुहास लोखंडे आदी कार्यकर्ते मेहनत घेत आहेत. 

Web Title: Natyajlalash is the opportunity for people to express themselves honestly! - Viju Mane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.