शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना काळातील ठाणे पोलिसांची कामगिरी कौतुकास्पद: एकनाथ शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 01:04 IST

गुन्हेगारीवर नियंत्रणाबरोबरच ठाणे पोलिसांनी कोरोनाच्या संकटकाळात ठाणेकरांना मदतीचा हात दिला. आता रक्तदान करुन माणूसकीचे दर्शनही घडविले, असे गौरवोद्वगार ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील पोलिसांच्या रक्तदान शिबिरामध्ये बुधवारी काढले.

ठळक मुद्दे ठाण्यातील ५०० पोलिसांचा रक्तदानाचा संकल्प राज्यातील रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यासाठी घेतला पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: परप्रांतीयांना दिली जाणारी मदत असो की, अन्नधान्याचे वाटप असो गुन्हेगारीवर नियंत्रणाबरोबरच ठाणेपोलिसांनी कोरोनाच्या संकटकाळात ठाणेकरांना मदतीचा हात दिला. आता रक्तदान करुन माणूसकीचे दर्शनही घडविले, असे गौरवोद्वगार ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील पोलिसांच्या रक्तदान शिबिरामध्ये बुधवारी काढले.येथील सिद्धी हॉल सभागृहामध्ये ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातर्फे पोलिसांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. त्यावेळी या शिबिरामध्ये औपचारिकरित्या मार्गदर्शन करतांना पालकमंत्री शिंदे यांनी हे गौरवोद्गार काढले. यावेळी त्यांच्यासमवेत ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, सह पोलीस आयुक्त डॉ. सुरेश मेकला, अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रविण पवार, मुख्यालयाचे पोलीस उपायुक्त गणेश गावडे यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित होते.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ठाणे पोलिसांनी या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. शिबिराच्या प्रारंभानंतर काही काळातच तब्बल १५० पोलिसांनी रक्तदान केले. सुमारे ५०० पोलीस रक्तदान करून हा तुटवडा संपुष्टात आणण्याचा निर्धार ठाणे पोलिसांनी केला आहे.राज्यात रक्ताचा तुटवडा असल्याने मुख्यमंत्र्यानी आवाहन केल्यानंतर अशा प्रकारे राज्यात प्रथमच ठाणे पोलिसांनी रक्तदानासाठी पुढाकार घेतला, ही बाबही कौतुकास्पद असल्याचे पालकमंत्री शिंदे यावेळी म्हणाले. राज्यभरात रक्ताचा तुटवडा असताना विविध पक्ष, नेत्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबिरे सुरु आहेत. त्यात ठाणे पोलिसांनीही आपला खारीचा वाटा देत रक्तदान शिबिराचे आयोजन केले. मुख्यालयाचे पोलीस उपायुक्त गणेश गावडे, ठाणेनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम सोमवंशी, ठाणे नगर पोलीस ठाण्यातील कर्मचारी, मुख्यालयातील कर्मचाऱ्यांसह महिला कर्मचाऱ्यांनीही या रक्तदान शिबिरात आपला सहभाग नोंदविला. पोलीस आयुक्त फणसळकर यांनीही रक्तदान करणाºया आपल्या कर्मचाºयांची आस्थेने विचारपूस करुन त्यांच्या दातृत्वाचे कौतुक केले.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्र