शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
3
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
4
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
5
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
6
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
7
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
8
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
9
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
10
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
11
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
12
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
13
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
14
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
15
तुळजाभवानी मंदिरात देणगी दर्शन पासच्या शुल्कात दुप्पट वाढ, मात्र अभिषेकाची संख्या वाढवली
16
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
17
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
18
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
19
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
20
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!

पाणी पळवणाऱ्यांना मिळाले मोकळे रान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2016 02:34 IST

णीकपात धुडकावून लावत उल्हास नदीतून जादा पाणी उचलून कल्याण-डोंबिवलीच्या तोंडचे पाणी पळवणाऱ्या मीरा-भार्इंदर पालिकेवर कारवाई करण्याबाबत लघुपाटबंधारे

कल्याण : पाणीकपात धुडकावून लावत उल्हास नदीतून जादा पाणी उचलून कल्याण-डोंबिवलीच्या तोंडचे पाणी पळवणाऱ्या मीरा-भार्इंदर पालिकेवर कारवाई करण्याबाबत लघुपाटबंधारे खात्याने कानांवर हात ठेवले आहेत. कारवाई करणे आमच्या हातात नाही. आम्ही फक्त कपातीचे आणि पाणी कसे-किती वापरावे, याचे प्रमाण-आरक्षण ठरवून दिले आहे, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. उल्हास नदीच्या पात्रातून कल्याण-डोंबिवली महापालिका पाणी उचलते. त्यावर, शुद्धीकरणाची प्रक्रिया करून ते पुरविते. या पालिकेप्रमाणेच बदलापूरजवळ महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नदीतून पाणी उचलते. जांभूळ येथे औद्योगिक विकास महामंडळ पाणी उचलते. स्टेम पाणीपुरवठा योजनाही या पात्रातून पाणी उचलते. या विविध पाणीग्राहक संस्थांना नदीच्या पात्रातील आरक्षणाचा कोटा ठरवून दिला आहे. नदीपात्रात बारवी आणि आंध्र धरणातून पाणी सोडले जाते. ही दोन्ही धरणे पूर्ण न भरल्याने नोव्हेंबरपासून ३० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली. मात्र, मीरा-भार्इंदर पालिकेने ही पाणीकपात धुडकावून लावत काही दिवसांपासून जास्तीचे पाणी उचलण्यास सुरुवात केली. परिणामी, कल्याण-डोंबिवलीत ठणठणाट झाला. पाण्याच्या पळवापळवीबाबत कारवाई कोण करणार, ते स्पष्ट नाही. कोणी किती पाणी उचलावे, हे ठरवून देणाऱ्या लघुपाटबंधारे खात्याने जादा पाणी उचलण्याच्या कारवाईशी आपला संबंध नसल्याचे सांगत जबाबदारी झटकली आहे. आम्ही विनंती करू शकतो!मीरा-भार्इंदर ३० टक्के पाणीकपात पाळत नसेल. जास्तीचे पाणी घेत असेल तर त्याविरोधात कारवाई काय करणार, अशी विचारणा लघुपाटबंधारे खात्याचे उपअभियंता हेमंत कुलकर्णी यांच्याकडे केली असता त्यांनी सांगितले, पाण्याचे नियोजन करण्यासाठी आम्ही ३० टक्के पाणीकपात लागू केली आहे. त्याची अंमलबजावणी एखादी संस्था करीत नसेल, तर त्यांच्याविरोधात कारवाईचा अधिकार आम्हाला नाही. आम्ही केवळ त्यांना कपात लागू करा, अशी विनंती करू शकतो. तशी चर्चा आम्ही मीरा-भार्इंदरशी केली आहे. थोडी स्थिती सुधारली : जुनेजानदीपात्रातील ज्या विहिरीतून पाणी घेतले जाते, त्या विहिरीची पातळी दोन दिवसांपूर्वी ०.८० मीटर इतकी खालावली होती. ही सोमवारची स्थिती. त्यात बुधवारी थोडी सुधारणा झाली. बुधवारी पाण्याची पातळी ७० सेंटिमीटरने वाढल्याचे केडीएमसी अभियंता तरुण जुनेजा यांनी सांगितले. स्टेम आणि कल्याण-डोंबिवलीच्या मोहने येथील पाणीउपशाच्या ठिकाणी असलेल्या पंपांमधील अंतर ५० मीटर असल्याने स्टेमच्या दिवसरात्र सुरू असलेल्या उपशाचा फटका केडीएमसीच्या पाणीपुरवठ्याला बसतो. त्यामुळे तेथे पाणीटंचाई जाणवते आहे. त्यामुळे स्टेममार्फत होणाऱ्या पाणीपुरवठ्यासाठी, योग्य नियोजनासाठी किमान एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवणे अपरिहार्य आहे. - सुनील सोनावणे, जिल्हा लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता मीरा-भार्इंदर पालिकेने कोणाच्याही तोंडचे पाणी पळविलेले नाही. उलट, आमच्या हक्काचे पाणी मागितले असून ते शासकीय धोरणानुसार स्टेममार्फत वितरीत केले जात आहे. - अच्युत हांगे, पालिका आयुक्त सरकारच्या धोरणानुसारच मीरा-भार्इंदर पालिकेची पाणीकपात शिथिल करण्यात आली आहे. त्याबाबत स्टेमने लघुपाटबंधारे विभागाकडे पत्रव्यवहार केला. पण, त्यानंतरही त्यांनी अद्याप नियोजनासाठी निर्देश दिलेले नाहीत.- शशिकांत साळुंखे, स्टेमचे महाव्यस्थापक