दासगाव : दासगावसारख्या गावातून शिक्षण घेत आपल्या कौशल्याच्या आधारे दीपेश उकीर्डे या तरुणाने पारंगत होत समाज जीवनाचे चित्रण कुंचल्यातून साकारले आहे. कामगार, मच्छीमार, कष्टकरी आदिंचा समावेश दीपेशच्या चित्रतून दिसत आहे.
महाड तालुक्यातील दासगाव हे एक बंदर असलेले गाव आहे. आजही याठिकाणी होणारा आठवडा बाजार प्रसिद्ध आहे. गावातील लोकांचा मूळ व्यवसाय हा मच्छीमारी होता. मात्र प्रदूषित पाण्यामुळे हा व्यवसाय आता मागे पडला. गावातील तरुणांनी मोठय़ा शहरात नोकरीनिमित्त स्थलांतर केले. तर अनेकजण इतर व्यवसायात काम करू लागले आहेत. दासगावमधील दीपेश उकीर्डे या तरुणाने शिक्षण घेत असतानाच कामाला सुरुवात केली आहे.
शालेय जीवनापासून चित्रकलेची आवड असलेल्या दीपेशने आपले महाविद्यालयीन शिक्षण देखील चित्रकलेच्या माध्यमातूनच केले. सावडे या ठिकाणी त्याने कला शिक्षणाचे धडे घेतले. शिक्षणाबरोबरच दीपेशला चित्रकलेतील नवीन तंत्र समजू लागले आणि त्याचा उत्साह अधिकच द्विगुणित झाला. कला शिक्षकाची डीएड ही पदविका पूर्ण केल्यानंतर दीपेशने गावात येवून गावातील तसेच विविध समाज जीवनाचे चित्रण आपल्या कुंचल्यातून साकारण्यास सुरुवात केली. (वार्ताहर)
च्आजमितीला दीपेशकडे जवळपास 6क् पोट्रेट तयार आहेत. यामध्ये वस्तुचित्र, रचनाचित्र, निसर्गचित्र, संकल्पचित्रंचा समावेश आहे.
च्मोठमोठय़ा शहरातून चित्रकलेची साधने सहज उपलब्ध होतात, दासगावमध्ये राहून दीपेशने कुंचल्याच्या आधारे रेखाटलेली चित्रे देखील दाद देण्यासारखी
आहेत.