शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
5
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
6
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
7
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
8
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
9
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
10
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
12
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
13
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
14
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
15
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
16
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
17
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
18
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
19
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
20
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

जनतेनं निवडला, ‘आमदार’ परी नाही; शपथ न घेतल्याने पेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 23:26 IST

सरकारच्या घोळामुळे राजशिष्टाचाराचा ‘सलाम’ नाही

- सुरेश लोखंडे ठाणे : लवाजम्यासह ते सरकारी कार्यालयात दाखल झाले आणि ते विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्याचे सर्वश्रुत असतानाही त्यांना ‘आमदार’ म्हणून संबोधता येत नाही. एखाद्या कामाकरिता त्यांना पत्र द्यायचे असेल, तर नावापुढे ‘आमदार’ लिहिता येत नाही. एखादा कार्यक्रम असल्यास हारतुरे देऊन सन्मान करायचे म्हटले तरी ते अजून अधिकृतपणे शपथ घेतलेले ‘आमदार’ नसल्याची अडचण होत आहे. सरकार स्थापनेचा घोळ आणि राष्ट्रपती राजवटीमुळे चौदाव्या विधानसभेतील राज्यभरात निवडून आलेल्या २८८ उमेदवारांना ‘आमदार’ म्हणून संबोधता येत नाही.विजयश्री मिळवूनही आमदार न झालेल्या ठाणे व पालघर जिल्ह्यांतील २४ विजयी उमेदवारांना राजशिष्टाचारापासून विन्मुख राहावे लागले आहे. या विजयी उमेदवारांनी विधानसभा सदस्यत्वाची शपथ न घेतल्यामुळे त्यांच्या आमदारकीवर शिक्कामोर्तब झालेले नाही. त्यामुळे एखाद्या कार्यक्रमपत्रिकेत आमदार म्हणून त्यांचा उल्लेख करणे अशक्य झाल्याने प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे.ठाणे जिल्ह्यातील १८ आमदारांसह पालघर जिल्ह्यातील सहा आमदारपदांसाठी निवडणूक पार पडली. सुमारे एक महिन्यापूर्वी मतदान होऊन विजयी उमेदवार जाहीर झाले. मात्र, या उमेदवारांची घटनात्मकदृष्ट्या प्रशासनाकडून आमदार म्हणून नोंद घेतली जात नसल्याने लोकप्रतिनिधी असूनही ते आमदारकीचे ना अधिकार गाजवू शकतात, ना मानमरातबास पात्र ठरतात. महापालिका, नगरपालिका, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद एवढेच नव्हे तर पंचायत समिती आणि ग्रामपंचायत कार्यालयात हे विजयी उमेदवार गेले तरी त्यांना आमदार संबोधले जात नाही. त्यांना आमदारांचा राजशिष्टाचार अद्याप लागू होत नाही. या स्थानिक स्वराज्य संस्थांचे काही कार्यक्रम असले, तर स्थानिक आमदार म्हणून त्यांना बोलवायचे की नाही, असा प्रश्न प्रशासनास पडतो. बोलावले तरी आमदार म्हणून व्यासपीठावर बसवून सन्मान करता येत नाही. समजा, नाही बोलावले तरी अपमान केल्याचा रोष पदरी येत आहे. यामुळे प्रशासनाची चांगलीच गोची झाली आहे.राज्याच्या तेराव्या विधानसभेची मुदत संपल्याने ती बरखास्त झाली आहे. तर, चौदावी विधानसभा अस्तित्वात आलेली नाही. यामुळे राज्यात राष्टÑपती राजवट लागू झाली. यात आता जुन्या आमदारांसह नव्याने निवडून आलेल्यांना आमदार म्हणून कोणतेही काम करण्याचा किंवा सुचवण्याचा अधिकार अद्याप प्राप्त झालेला नाही.डीपीसीसमोरही पेचजिल्हा प्रशासनाचा गाडा हाकण्यासाठी महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या जिल्हा नियोजन समिती अर्थात डीपीसीच्या बैठकीसमोरही यामुळे पेचप्रसंग निर्माण झाला आहे. जुनी विधानसभा बरखास्त झाल्यामुळे व नव्या आमदारांचा शपथविधी न झाल्याने त्यांना या बैठकीस निमंत्रण द्यावे की नाही, असा पेच प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. यामुळे आता विधान परिषदेचे सदस्य, खासदार, डीपीसी सदस्य हेच डीपीसीचे अधिकृत निमंत्रित आहेत. परंतु, पालकमंत्री नसल्यामुळे आता डीपीसी बैठक घ्यायची झाल्यास जिल्हाधिकारी हेच डीपीसीचे अध्यक्ष राहतील.