लोकमत न्यूज नेटवर्कबदलापूर / अंबरनाथ : राज्य सरकारकडे प्रलंबित असलेल्या मागण्या मान्य होत नसल्याने अंबरनाथ आणि बदलापूर पालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सामूहिक रजा आंदोलन केले. या आंदोलनामुळे पालिकेचे कामकाज पूर्ण ठप्प झाले होते. तर दुसरीकडे अंबरनाथ पालिकेच्या सर्वसाधारण सभेलाही अधिकारी गैरहजर होते. मुख्याधिकाºयांसह सर्व कर्मचारी गैरहजर राहिल्याने पालिकेत दिवसभरात कोणतेच काम झाले नाही.पालिका कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू करणे, जिल्हा परिषद कर्मचाºयांप्रमाणे राज्य सरकारच्या कर्मचाºयांना वेतन द्यावे, २४ वर्षे आश्वासित प्रगती योजनेचा लाभ विनाअट द्यावा, सफाई कामगारांना मोफत घरे, तसेच वर्ग ४ च्या कर्मचाºयांना सरकारी सुट्या, ओव्हरटाइम भत्ता मिळावा, अनुकंपा तत्त्वावरील प्रकरणे तातडीने निकाली काढावी, सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० करावे, महिला कर्मचारी आणि अधिकाºयांना बालसंगोपन रजा मिळावी, यासह विविध मागण्यांसाठी हे सामूहिक रजा आंदोलन झाले. सरकारने या मागण्या ताताडीने मान्य करून नगरपालिका कर्मचाºयांना न्याय देण्याची मागणी या वेळी आंदोलनकर्त्यांनी केली.कर्मचाºयांच्या आंदोलनाला मुख्याधिकाºयांच्या संघटनेनेसुद्धा काम बंद अर्थात सामूहिक रजा घेऊन आंदोलनाला पाठिंबा दिला आहे, असे अंबरनाथचे मुख्याधिकारी देविदास पवार यांनी सांगितले. आज दिवसभर या आंदोलनामुळे पालिका कार्यालयात शुकशुकाट होता. कर्मचाºयांनी रजा आंदोलन केले असले तरी बहुसंख्य कर्मचारी पालिका कार्यालयात काम न करताच फिरताना दिसत होते.
मागण्या प्रलंबित : पालिका कर्मचाºयांचे रजा आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 05:43 IST