शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

२८ फेब्रुवारीपर्यत कर भरा अन् १०० टक्के सूट मिळवा; करदात्यांचाही उत्तम प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2021 12:18 IST

ठाणे महापालिकेचा निर्णय

ठाणे:  ठाणे महापालिकेच्या वतीने सन 2020-21 या आर्थिक वर्षात जे निवासी करदाते आपला थकीत मालमत्ता कर चालू वर्षाच्या मागणीसह एकत्रित जमा करतील त्यांच्या थकीत मालमत्ता करावर आकारलेल्या शास्तीच्या रकमेवर १०० टक्के सवलतीची योजना १ ते ३१ जानेवारी या कालावधीत सुरू केली होती, या कालावधीत करदात्यांचा मिळालेला उत्सफूर्त  प्रतिसाद विचारात घेवून या योजनेस २८ फेब्रुवारी २०२१ पर्यत मुदतवाढ देण्याचा निर्णय महापौर नरेश म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांनी घेतला आहे.

करदात्यांसाठी ही योजना १ ते २८ फेब्रुवारी २०२१ या कालावधीकरिता कार्यान्वित असणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कराची थकबाकी असल्यास संपूर्ण थकबाकी, संपूर्ण चालू मागणी आणि सूट नंतरची देय शास्ती (दंड / व्याज) ची रक्कम उपरोक्त मुदतीमध्ये एकत्रित जमा करणे अनिवार्य आहे. ज्या करदात्याने मालमत्ता कराची व पाणीपट्टीची संपूर्ण रक्कम शास्तीसह या योजनेपूर्ण जमा केली असेल त्यांना ही सूट देय असणार नाही.

प्रस्तुत शास्ती (दंड/ व्याज) माफीच्या योजनेतंर्गत काही विवाद/ आक्षेप उत्पन्न झाल्यास त्याबाबत महापालिका आयुक्त यांचे निर्णय अंतिम व बंधनकारक राहील. १ ते २८ फेब्रुवारी २०२१ पर्यत कर जमा करुन योजनेचा लाभ घेतलेल्या नागरिकांना महापालिकेच्या अटी मान्य आहेत, असे समजण्यात येईल, त्या संदर्भात कोणताही आक्षेप करदात्यांना घेता येणार नाही.

असे भरता येईल देयके

ऑनलाईन पध्दतीने मालमत्ता कर भरणेकरिता देयके महापालिकेच्या www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. जे करदाते, नागरिक त्यांचा मालमत्ता कर प्रत्यक्ष प्रभाग कार्यालयात येऊन भरतात अशा करदात्यांना सोईचे व्हावे याकरिता ठाणे महानगरपालिकेची सर्व प्रभाग व उपप्रभाग स्तरावील कर संकलन केंद्र तसेच महापालिका प्रशासकीय भवनातील नागरी सुविधा केंद्रामधील कर संकलन केंद्र २८ फेब्रुवारी 2021  पर्यत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी १०.३० ते सायं. ५ तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी  व सर्व शनिवार या दिवशी सकाळी १०.३० ते सायं. ४ या वेळेत सुरू राहतील. तसेच ठाणे महानगरपालिकेच्या DigiThane या ॲपद्वारे मालमत्ता कराचा भरणा केल्यास या  DigiThane ॲपद्वारे मिळणारी सूटही मिळू शकेल. तरी नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन ठामपाने केले आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाTaxकर