शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

झाडांच्या लागवडीसाठी २० कोटी भरा; मीरा-भाईंदर महापालिकेचं MMRDA ला पत्र

By धीरज परब | Updated: March 21, 2025 23:33 IST

मेट्रो कारशेडचे आरक्षण मुर्धा - राई गावा मागील मोकळ्या जमिनीवर टाकल्याचा आरोप करत स्थानिक ग्रामस्थांनी कारशेडला विरोध चालवला होता.

धीरज परब

मीरारोड- भाईंदर येथील मेट्रो कारशेडच्या पहिल्या टप्प्यातील १ हजार ४०६ बाधित झाडांच्या बदल्यात ८ हजार २९२ झाडे लावण्यासाठी महापालिके कडे २० कोटी ७७ लाख २१ हजार ८०० रुपये इतका वृक्षनिधी आधी जमा करावा असे पत्र मीरा भाईंदर महापालिकेने एमएमआरडीएला दिले आहे. 

भाईंदरच्या पश्चिमेच्या तोदि वाडी येथे मेट्रोचे सुभाषचंद्र बोस मैदान स्थानक येणार आहे.  लगतच्या परिसरात खाजगी विकासक व राधास्वामी संस्थेची मुबलक मोकळी जागा असताना मेट्रो कारशेडचे आरक्षण मुर्धा - राई गावा मागील मोकळ्या जमिनीवर टाकल्याचा आरोप करत स्थानिक ग्रामस्थांनी कारशेडला विरोध चालवला होता. त्या विरोधा मुळे मेट्रो कारशेडचे आरक्षण रद्द करून डोंगरी येथील डोंगरावर टाकले गेले. 

स्थानिक ग्रामस्थांनी कारशेडला सुरवातीला विरोध केला नाही.  पहिल्या टप्प्यात डोंगरावर कारशेड साठी सरकारी आणि खाजगी जागेतील १ हजार ४०६ झाडे काढण्याचा एमएमआरडीएचा प्रस्ताव महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाने मंजुर केला. मात्र त्यावेळी काही नागरिकांच्या हरकतीच्या अनुषंगाने पालिका उपायुक्त कल्पिता पिंपळे यांनी एमएमआरडीएला १५ जानेवारी रोजी पत्र देऊन  पुनर्रोपण केली जाणारी ५७४ झाडे तर नव्याने लावावी लागणारी ८ हजार २९२ झाडे कुठे लावणार ? त्याचा आराखडा सादर करण्यास सांगितले. 

एमएमआरडीएने झाडे लावण्याबद्दलचा आराखडा सादर केला नाही. महापालिकेच्या ठरावा नुसार झाड लावण्यास जागा नसेल तर प्रतिझाड २५ हजार रुपये इतका वृक्ष निधी घेण्याचा, पुनर्रोपण साठी १० हजार रुपये प्रति झाड अनामत रक्कम घेणे व पाहणी शुल्क प्रतिझाड ३०० रुपये आकारणे असा ठराव आहे. 

ठरावाच्या अनुषंगाने १९ मार्च रोजी उपायुक्त पिंपळे यांनी एमएमआरडीएला पत्र देऊन झाडांची लागवड व देखभाल करण्यासाठी एमएमआरडीए कडे जागा नसल्याने वृक्षनिधी म्हणून ८ हजार २९२ झाडांचे प्रतिझाड २५ हजार रुपये प्रमाणे २० कोटी ७३ लाख रुपये तर मूळ १ हजार ४०६ झाडांची पाहणी शुल्क म्हणून ४ लाख २१ हजार ८०० रुपये असे एकूण २० कोटी ७७ लाख २१ हजार ८० रुपये इतकी रक्कम महापालिकेकडे जमा करण्यास सांगितले आहे. सदर रक्कम पालिका फंदात जमा केल्या नंतर त्यांची पावती सादर केल्यावर ८३२ झाडे मुळासहित तर ५७४ झाडे पुनर्रोपणची कार्यवाही करण्यात येईल असे स्पष्ट केले आहे. 

दरम्यान दुसऱ्या टप्प्यात ९ हजार ९०० झाडे काढली जाणार असल्याने त्या विरोधात मोठ्या संख्येने महापालिके कडे हरकती आल्या आहेत. सदर झाडांच्या अनुषंगाने वृक्षनिधिची रक्कम ८० ते १०० कोटीं पेक्षा जास्त जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Metroमेट्रो