शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकांमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन द्या, नीलम गोऱ्हे यांच्या आयुक्तांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2020 00:12 IST

Thane : कामगार नेते मिलिंद रानडे यांनी उपसभापतींकडे पत्राद्वारे ही मागणी केली होती. त्यानुसार, शनिवारी ही बैठक आयोजित वेबिनारच्या माध्यमातून घेण्यात आली.

ठाणे : ठाणे महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका व बदलापूर नगरपालिकेमधील कंत्राटी कामगारांना किमान वेतन लागू करून किमान वेतनाचा फरक देण्याचे आदेश विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत. तसेच सामाजिक न्याय विभागाची सफाई कर्मचाऱ्यांसाठी केंद्र शासन पुरस्कृत योजनांची अंमलबजावणी सर्व नगरपालिका व महानगरपालिकांत राबवावी, अशा सूचनाही महानगरपालिका आयुक्तांना दिल्या. कामगार नेते मिलिंद रानडे यांनी उपसभापतींकडे पत्राद्वारे ही मागणी केली होती. त्यानुसार, शनिवारी ही बैठक आयोजित वेबिनारच्या माध्यमातून घेण्यात आली. रानडे यांनी १४०० सफाई कर्मचारी व २५० ड्रायव्हर यांच्या किमान वेतनाप्रमाणे पगार द्यावा, प्रलंबित एकरकमी फरक द्यावा, कामगारांना प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार द्यावा व आवश्यक सुरक्षारक्षक साहित्य द्यावे, अशा मागण्या मांडल्या. या बैठकीला ठामपाचे महापौर नरेश म्हस्के, महेश पाठक (प्रधान सचिव नगरविकास), ठामपा आयुक्त डॉ. विपिन शर्मा, केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी हजर होते. शर्मा यांनी ठाणे महापालिकेत किमान वेतनाचा फरक फेब्रुवारी २०१५ ते नोव्हेंबर २०१६ देण्यासंदर्भात महापौर तयार असून उर्वरित दोन हप्ते २०२१ मध्ये देण्यात येतील, असे स्पष्ट केले. एकूण १७ कोटी रुपये प्रलंबित देणी असून प्रत्येक हप्ता हा ५.५० कोटींचा असेल, असेही सांगितले. तर, महापौर नरेश म्हस्के यांनी कर्मचाऱ्यांना व्यक्तिगत संरक्षण किट देण्यात येत असून महिन्याच्या ७ नाेव्हेंबरपर्यंत पगार करण्यासंदर्भात सूचना दिल्याचे सांगितले.

‘व्यक्तिगत संरक्षण साहित्य द्या’गोऱ्हे यांनी नगरपालिका व महानगरपालिका यांच्याकडील प्रत्येक सफाई कामगाराला व्यक्तिगत संरक्षण साहित्य द्यावे. त्यांची वैद्यकीय तपासणी वेळेवर करावी. तसेच केंद्र सरकारच्या सफाई कामगारांसाठी असणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी राज्यात शहरी स्थानिक संस्थांमध्ये किती सफाई कर्मचारी आहेत, याबाबत माहिती गोळा करून सामाजिक न्याय विभागाबरोबर सविस्तर बैठक घेऊन या योजनेचा लाभ या सफाई कर्मचाऱ्यांना दिला जाईल, हे पाहावे, असे निर्देश प्रधान सचिव नगरविकास यांना त्यांनी दिले.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाNeelam gorheनीलम गो-हे