शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पाटोळपाडा, तेलमपाडा पाणीटंचाईने त्रस्त, ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 01:05 IST

भातसा धरणक्षेत्रातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेळूक ग्रामपंचायत हद्दीतील पाटोळपाडा, तेलमपाडा परिसर पाणीटंचाईने त्रस्त झाला आहे.

- श्याम धुमाळकसारा : भातसा धरणक्षेत्रातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेळूक ग्रामपंचायत हद्दीतील पाटोळपाडा, तेलमपाडा परिसर पाणीटंचाईने त्रस्त झाला आहे. येथे २ कूपनलिका, २ विहिरी आहेत. परंतु, कुठेच पाणी नसल्याने तेलमपाडा येथील महिलांना तसेच पुरूषांना ४ टेकड्या पार करून भातसा धरणक्षेत्रात उतरून पाण्याची व्यवस्था करावी लागते आहे. मुलाबाळांना घरी ठेवून संपूर्ण दिवस पाण्यासाठी खर्च करावा लागतो. महिलांसोबतच पुरूषांनाही पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने रोजगार बुडतो आहे. त्यामुहे पोट कसे भरायचे, असा प्रश्न येथील आदिवासींना पडला आहे. या गावातील महिलांना ४ किमी. अंतरावरील सुसरवाडी येथील साठलेल्या पाण्यात कपडे धुण्यासाठी जावे लागते. या पाण्याची पाहणी केली असता ते प्रदूषित असल्याचे आढळले. या साठलेल्या पाण्याच्या आसपासची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. एखादी व्यक्ती पाय घसरून पडल्यास जबर दुखापत होण्याचा धोका जास्त आहे.पाणी योजनेचे तीनतेरापाटोळपाडा आणि गाव यासाठी २००७ - ०८ मध्ये ५१.४३ लाखांच्या योजनेचे काम अर्धवट ठेवून कंत्राटदाराने नागरिकांना पाणीटंचाईच्या दरीत ढकलले आहे. या परिसरातील योजना भातसा पाणलोट क्षेत्रात असूनही विहिरीवर राबवण्याचा घाट घातला जात आहे.जानेवारीतच या विहिरी कोरड्या पडत असल्याने पाणीच मिळाले नाही. संपूर्ण रात्र महिलांना पाण्यासाठी जागावे लागते. कूपनलिकांमधील पाणी संपले तर ३ किमी अंतरावर दऱ्याखोऱ्यांमधून भातसा पाणलोट धरणक्षेत्रात जावे लागते.पाण्यासारखी मूलभूत गरजही पूर्ण होत नसल्याने पाटोळपाडा येथील आदिवासी लोकांनी लोकसभेसाठी मतदान न करून आपली नाराजी व्यक्त केली आहे. पाण्याची महत्त्वाची समस्या न सुटल्यास संपूर्ण परिसराने एकत्र येऊन विधानसभा आणि जिल्हा परिषद मतदानावर बहिष्कार टाकण्याची योजना आखली असून लोकप्रतिनिधींना प्रचाराला येऊच न देण्याचे ठरवले आहे.या पाणीटंचाईमुळे ग्रामस्थ अत्यंत त्रस्त असून प्रशासनाने यावर काही ना काही कायमस्वरूपी उपाय करण्याची मागणी होत आहे. दरवर्षी उन्हाळ्यात होणारा हा त्रास संपावा, अशी त्यांची इच्छा आहे.पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपायहा भाग डोंगरमाथ्यावर वसल्याने पावसाचे पाणी थेट वाहून जाते. योग्य नियोजन नसल्याने पाणी जमिनीत मुरत नाही. नाल्यांमध्ये गाळ साचल्याने पाणी वाहून जाते. हा गाळ काढून पाणी साठवण्यासाठी योग्य नियोजन केले तर भूजल साठ्यात वाढ होऊ शकते. तर दुसºया बाजूने विचार केल्यास मुंबईला पाणीपुरवठा करणाºया भातसा धरणाची एक बाजू या तीनही गावांना पाणीपुरवठा करू शकते. काही परिसरात जुनी नळ योजना, साठवण टाक्या आहेत. फक्त काही लाख रु पये खर्च करून भातसा धरणातील पाणी योग्य नियोजन करून निधी उपलब्ध केल्यास कायमस्वरूपी पाणी टंचाईवर मात होऊ शकते.पशूंची अवस्था अत्यंत बिकटमाणसांनाच पाणी नाही, तर जनावरांसाठी कुठून आणायचे, असा संतप्त सवाल येथील नागरिक करत आहेत. पाणी नसल्याने पशूंचा मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहेत. शिवाय पशू वैद्यकीय अधिकारीही येथे फिरकत नसल्याने जनावरे मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे स्थानिक शिवराम भिका झुगरे यांनी सांगितले.दापूरवासीयांपाठोपाठ अजनूपवासीयांचा देखील सर्व निवडणुकांवर बहिष्कारअजनूप ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात येणाºया उठावा, दापूर माळ, बांदलवाडी, सावरखेड, या गावांच्या लगत मुंबईला पाणीपुरवठा करणाºया मध्य वैतरणा धरणाचे बॅक वॉटर नदीपात्र आहे; परंतु ते पाणी या गावकऱ्यांना उपलब्ध होत नाही. खर्डी वनविभागाच्या मुजोरपणामुळे या ग्रामस्थांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. या नदीपात्रावर पाणी आणण्यासाठी पायवाट रस्ता वनविभाग करून देत नसल्याने गावकरी खोल दरीत उतरून पाणी जमा करत असतात. या गावातील ग्रामस्थांनी अनेकदा पाणी आणण्यासाठी किमान पायवाट तरी करून देण्याची मागणी केली होती. ती पूर्ण झाली नाही.दापूरमाळ आणि सावरखेडची अवस्था तर अतिशय दयनीय आहे. या गावात वीज, रस्ता, पाणी, दवाखाना या मूलभूत गरजाच लोकांना माहीत नाहीत. अनेक समस्यांनी ग्रासलेल्या या ग्रामस्थांनी या वेळी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता.डबक्यातील पाणी पित आपली तहान भागवणाºया दापूरवासीयांना रस्ता तसेच पाणी न मिळाल्यास विधानसभा निवडणुकीसह बहिष्कार टाकणार असून पाण्यासाठी वेठीस धरणाºया वनविभाग, लघुपाटबंधारे आणि आदिवासी विकास प्रकल्पाविरोधात लवकरच आंदोलन करणार असल्याचे विजय शिंगवा यांनी सांगितले.स्वच्छ भारत मिशनमधील शौचालय बंदस्वच्छ भारत मिशन अंतर्गत तयार करण्यात आलेल्या शौचालयाचा पाण्याअभावी वापर होत नसल्याने घरोघरी असलेल्या शौचालयात पेंढा भरून ठेवला आहे.शहापूर तालुक्यातील बहुतांश पाणी योजना अपूर्णावस्थेत आहेत. त्यासंदर्भात लवकरच चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येईल.    - रावसाहेब आढे, अभियंता,     पाणीपुरवठा विभाग, ठाणे

 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईthaneठाणे