रुग्णांनो घाबरू नका, जिल्हा परिषद तुमच्या पाठीशी आहे; जिल्हा परिषद अध्यक्षांची कृतज्ञता  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 02:28 PM2020-07-27T14:28:45+5:302020-07-27T14:30:32+5:30

ठाणे : कोरोना साथरोगाशी झुंज देणाऱ्या, कोरोना रुग्णांची मुरबाडच्या कोव्हिडं सेंटरवर जाऊन  राज्य हातमाग महामंडळ अध्यक्ष प्रकाश पाटील, ठाणे ...

Patients, don't be afraid, Zilla Parishad is behind you; Gratitude of Zilla Parishad President | रुग्णांनो घाबरू नका, जिल्हा परिषद तुमच्या पाठीशी आहे; जिल्हा परिषद अध्यक्षांची कृतज्ञता  

रुग्णांनो घाबरू नका, जिल्हा परिषद तुमच्या पाठीशी आहे; जिल्हा परिषद अध्यक्षांची कृतज्ञता  

Next

ठाणे: कोरोना साथरोगाशी झुंज देणाऱ्या, कोरोना रुग्णांची मुरबाडच्या कोव्हिडं सेंटरवर जाऊन  राज्य हातमाग महामंडळ अध्यक्ष प्रकाश पाटील, ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे यांनी रविवारी प्रत्येक्ष भेट घेतली. यावेळी त्यांनी कोव्हिड रुग्णांशी आपुलकीने संवाद साधत त्यांच्या आरोग्याची विचारपूस केली. घाबरू नका जिल्हा परिषद आपल्या पाठीशी असल्याचे सांगत मानसिक आधार देण्याचा प्रयत्न करुन त्यांनी डाँक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.   

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या  वाढदिवसानिमित्त कोव्हिड यौध्याचे सन्मान करण्याचे आवाहन केले आहे. यास अनुसरुन पाटील, लोणे यांच्यासह जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणी दौरे करून कोरोनाबाधित रुग्णांसह कोव्हिडं यौद्यांचा यथोचित सन्मान रविवारी उशिरापर्यंत केला आहे. या दौऱ्या दरम्यान  पडघा येथील दवाखान्यातील डॉक्टरांप्रती ते बजावत असलेल्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत पाटील  आणि लोणे यांनी पीपीईकिट, मास्क, छत्री,  ड्रेस पीस, साडी  आदी भेट वस्तू देऊन डॉक्टरांचा सन्मान केला आहे.

या दौऱ्या प्रसंगी म्हसा, शिवले, सरलगाव आदी प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट  देऊन तेथील डॉक्टर, नर्स, आशा कार्यकर्ती, आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्यात आला. कोरोनाच्या महामारीत बजावत असलेल्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्या कामाचे कौतुक करत चव्यनप्राशचे वाटप केले.

Web Title: Patients, don't be afraid, Zilla Parishad is behind you; Gratitude of Zilla Parishad President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.