शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

व्हिडीओ रिल्स बनविण्याची हौस; महागड्या मोबाईलसाठी करायचे महागड्या सायकलींची चोरी...

By नितीन पंडित | Updated: August 26, 2022 16:46 IST

भिवंडीत महागड्या सायकलींची चोरी करणारे दोन अल्पवयीन आरोपी अटकेत.

नितीन पंडित 

भिवंडी: शहरात इमारतींच्या पार्किंगमधून लहान मुलांच्या महागड्या सायकली चोरीच्या घटना वाढल्या वाढल्या होत्या. विशेष म्हणजे मुलांच्या सायकली असल्याने पोलीस ठाण्यात त्याबाबत तक्रार दाखल होत नव्हत्या. मात्र एका पालकाने भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर या पोलीस सायकल चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी दोन अल्पवयीन चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून २ लाख १४ हजार रुपये किमतीच्या १२ महागड्या सायकली जप्त केल्या आहेत. या मुलांना सोशल मीडियावर व्हिडीओ रील बनविण्याची हौस होती आणि त्यासाठी महागडा मोबाईल वा होता. त्यासाठीच ही मुले महागड्या सायकल चोरून, त्या विकायचे. अशी माहिती पोलिसांना तपासात मिळाली आहे.

बुधवारी धामणकर नाका येथे पावभाजी खरेदी करण्यासाठी आलेल्या मुलाची महागडी सायकल चोरीची तक्रार भोईवाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. याप्रकरणाची गंभीर दखल घेत भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर इंदळकर, पोलीस निरीक्षक एस एन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व उपनिरीक्षक एस एम घुगे यांच्या नेतृत्वाखालील पोलीस हवालदार रमेश आतकरी,अरविंद गोरले,किशोर सूर्यवंशी,रामदास भवर,विजय कुंभार या पथकाने बातमीदाराच्या मदतीने तपास सुरू केला असता भंडारी कंपाऊंड येथील सदानंद हॉटेल येथे दोन संशयित सायकल घेऊन उभे असल्याची माहिती मिळाली.

पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकत दोन अल्पवयीन चोरट्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून दोन सायकली हस्तगत केल्या.त्यानंतर या दोघांकडे कसून चौकशी केली असता त्यांच्याकडून २ लाख १४ हजार रुपये किमतीच्या एकूण १२ सायकली जप्त केल्या आहेत.विशेष म्हणजे या अल्पवयीन मुलांना व्हिडीओ रील बनविण्याची हौस असून त्यासाठी महागडा मोबाईल खरेदी करण्याच्या इराद्याने तो या महागड्या सायकली चोरी करीत असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे .या दोन्ही विधिसंघर्षग्रस्त आरोपींना भिवंडी न्यायालयात हजर केले असता त्यांना भिवंडीतील बाल निरीक्षण गृहात ठेवण्यात आले आहे . 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी