शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

पंच्याहत्तरी पूर्ण करणाऱ्या ठाणेकर प्रवाशांना टीएमटीतून प्रवासाची विनामूल्य सुविधा

By अजित मांडके | Updated: August 24, 2022 17:36 IST

वयाची 75 वर्षे पूर्ण करणाऱ्या ठाणेकर प्रवाशांना टीएमटीतून प्रवासाची विनामूल्य सुविधा देण्यात आली आहे. 

ठाणे : ७५ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळापाठोपाठ ठाणे महापालिका परिवहन समितीच्या बसमधून पंच्याहत्तरी पूर्ण करणाऱ्या ठाणेकर प्रवाशांना विनामूल्य प्रवास करता येणार आहे. याबाबत परिवहन समितीने मंगळवारी झालेल्या समितीच्या सभेत एकमताने निर्णय घेतला असून या प्रवासासाठी ज्येष्ठ नागरिकांकडे टीएमटीचा (TMT)पास असणे बंधनकारक केले आहे. ज्येष्ठ नागरिकांनी दोन फोटो आणि आधार कार्डची प्रत जमा करावी असे आवाहन ही समितीने केले आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी वयाची ७५ वर्ष पूर्ण केलेल्या सर्व जेष्ठ नागरिकांना एस.टी. महामंडळाच्या बसने विनामूल्य प्रवास करण्याची सुविधा घोषित केली आहे. जेष्ठ नागरिकांप्रती विद्यमान सरकारने आपल्या कृतज्ञतेच्या भावना व्यक्त केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या औदार्यांचे हे उदाहरण समोर ठेवून ठाणे महापालिका परिवहन सेवेच्या सर्वसाधारण आणि वातानुकूलीत बसमधून देखील वयाची ७५ वर्ष पूर्ण केलेल्या ठाण्यातील प्रवाशांना विनामूल्य प्रवास करण्याची सवलत दयावी, असा प्रस्ताव परिवहन समिती सदस्य बालाजी काकडे यांनी मंगळवारी परिवहन समितीच्या सभेमध्ये मांडला असता, त्या ठरावाला सर्व सदस्यांनी एकमताने मंजूर देण्यात आली आहे. 

TMT कडून विनामूल्य प्रवासाची सुविधा पुढील पंधरा दिवसात वयाची ७५ वर्ष पूर्ण केलेल्या ठाणे महापालिका क्षेत्रात राहणाऱ्या सर्व प्रवाशांना ठाणे महापालिकेच्या बसेसमधून विनामूल्य प्रवास करण्याच्या सुविधेकरिता प्रशासनातर्फे पासेस देण्याची कार्यवाही सुरु करण्यात येईल. असे परिवहन व्यवस्थापक बेहेरे यांनी सांगितले. हे पासेस मिळण्याकरिता जेष्ठ नागरिकांनी आपल्या आधार कार्डची प्रत व दोन फोटो दयावेत व या सुविधेचा लाभ घ्यावा असे परिवहन समितीचे सभापती विलास जोशी यांनी सांगितले आहे.

 

 

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाpassengerप्रवासीChief Ministerमुख्यमंत्रीEknath Shindeएकनाथ शिंदे