शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

छोट्या पार्थनं घेतली अमित ठाकरेंची ग्रेट-भेट; चित्र पाहून केले भरभरून कौतुक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 11:12 IST

शुक्रवारी जेव्हा संकेत घुमरे आणि त्यांच्या पत्नीने अमित ठाकरेंना पार्थने काढलेली रेखाचित्रं दाखवली तेव्हा अमित आणि तिथे उपस्थित असलेले सर्वचजण थक्क झाले.

बदलापूर - मनसे नेते अमित ठाकरेंचा सध्या राज्य दौरा सुरू आहे. शुक्रवारी ते बदलापूरमध्ये मनविसेच्या  पुनर्बांधणी महासंपर्क बैठकांसाठी गेले असताना याठिकाणी चौथीत शिकणाऱ्या पार्थनं त्यांची भेट घेतली. कार्यकर्त्यांच्या गर्दीत हॉल तुडूंब भरला होता. त्यात संकेत घुमरे दाम्पत्याने त्यांचा मुलगा पार्थ यांच्यासाठी अमित ठाकरेंकडे २ मिनिटांची भेट मागितली परंतु प्रत्यक्षात ही भेट २० मिनिटांची घडली. 

घुमरे दाम्पत्यांनी अमित ठाकरेंना फक्त दोन मिनिटं भेटता येईल का? म्हणून विचारलं. पण प्रत्यक्षात २० मिनिटं त्यांची अमित ठाकरेंसोबत त्यांची 'ग्रेट भेट' झाली. त्याला कारणही तसंच होतं. इतर मुलांसारखा पार्थ हा सर्वसामान्य घरातील मुलगा पण कोरोना लॉकडाऊनच्या दिवसांत त्याला चित्रकला स्केचिंगची आवड युट्यूबमुळे निर्माण झाली. तो रोज स्केचिंगशी संबंधित व्हिडिओ बघून रेखाचित्र काढण्याचा सराव करायचा. बघता बघता त्याचा हात तयार झाला. कोणत्याही व्यक्तीचं हुबेहूब रेखाचित्र तो काढू लागला.

शुक्रवारी जेव्हा संकेत घुमरे आणि त्यांच्या पत्नीने अमित ठाकरेंना पार्थने काढलेली रेखाचित्रं दाखवली तेव्हा अमित आणि तिथे उपस्थित असलेले सर्वचजण थक्क झाले. अमित ठाकरेंनाही स्केचिंगची आवड असल्यामुळे आणि ते स्वतः एक उत्तम रेखाचित्रकार असल्यामुळे त्यांना छोट्या पार्थचं वेगळेपण समजलं. त्यांनी पार्थने काढलेल्या चित्रांच्या दोन्ही वह्या, त्यातलं प्रत्येक चित्र बघितलं. प्रत्येक चित्राबाबत पार्थला विचारलं आणि त्यांचं भरभरून कौतुक केलं. यावेळी"मला राजसाहेबांना भेटायचं आहे" अशी इच्छा पार्थने बोलून दाखवली, तेव्हा अमित ठाकरे म्हणाले, "नक्की. येताना तू काढलेली ही सगळी चित्रं सोबत घेऊन ये असं आमंत्रण त्याला दिले. 

अमित ठाकरेंचा कार्यकर्त्यांना सल्ला तुम्हाला राज ठाकरे यांचा मनसे पक्ष वाढवायचा असेल तर सर्वात आधी स्वत:चा अहंकार बाजूला ठेवा आणि कामाला लागा. पक्ष वाढवा, तसेच पूर्ण ताकदीने निवडणुका लढवा, असं अमित ठाकरे महासंपर्क अभियानात भिवंडीत पक्ष पदाधिकाऱ्यांशी बोलताना म्हणाले. तसेच गेल्या काही वर्षांत आपण अनेक पराभव बघितले आहेत. आता मात्र यापुढे आपल्याला फक्त विजय बघायचा आहे. आता राजकीय चढ-उतार नको, फक्त चढ हवा, असं अमित ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांशी बोलताना सांगितलं. 

टॅग्स :Amit Thackerayअमित ठाकरेMNSमनसे