शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत धोकादायक घराचा भाग कोसळला; दोन नागरिकांची सुखरूप सुटका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2021 17:12 IST

Bhiwandi : गेल्या काही दिवसापासून मुसळधार पावसाने थैमान घातले असून, वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे झाड व धोकादायक भिंत, झोपडी अन्य काही वस्तू पडण्याच्या घटना घडत आहेत.

-  नितिन पंडीत

भिवंडी : भिवंडी शहरातील वाणी आळी, झेंडा नाका परिसरात असलेले एक धोकादायक घर मंगळवारी दुपारी मुसळधार पाऊस सुरू असताना अचानक कोसळले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अचानक झालेल्या या दुर्घटनेत घरातील दोघांची (पुरुष व महिला) अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली. या दुर्घटनेमुळे घरातील राहिवाशांबरोबरच परिसरातील नागरिकांची एकच धावपळ उडाली होती.  

गेल्या काही दिवसापासून मुसळधार पावसाने थैमान घातले असून, वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे झाड व धोकादायक भिंत, झोपडी अन्य काही वस्तू पडण्याच्या घटना घडत आहेत. मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पाऊस सुरू असताना वाणी आळी झेंडा नाका चौक भागात येथे राहत असलेले मुरलीधर काळे यांचे जुने धोकादायक घराचा मागील काही भाग अचानकपणे कोसळला त्यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी महापालिका व अग्निशमन दलाला ही माहिती  मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन घरात अडकून पडलेल्या काळे कुटुबातील मुरलीधर काळे ( वय ७५ वर्ष ) व सुनीता काळे ( वय ५० ) या दोघांना सुरक्षित बाहेर काढून धोकादायक इमारतीच्या घराचा भाग काढून टाकला. 

या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी भिवंडी मनपा या दुर्घटनेतून काही बोध घेऊन शहरातील धोकादायक इमारतींमधील राहणाऱ्या नागरिकांना घरे खाली करण्यास सांगून त्यांच्या राहण्याची इतरत्र सोय करणार का?, की धोकादायक इमारतींना फक्त नोटीस बजावून आपले हात झटकण्याचेच काम करणार हे पाहणे गरजेचे आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडी