शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

आरटीईच्या प्रवेशासाठी बालकांच्या ऑनलाईन  अर्जातील दुरूस्तीची पालकांना संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 19:44 IST

पहिल्या फेरीतील विविध त्रृटींमुळे बहुतांशी बालकांच्या प्रवेशासाठी समस्या निर्माण झाली. त्यावर मात करण्यासाठी उपाययोजना म्हणून दुसरी सोडत काढण्यापूर्वी पालकांना प्रवेश अर्जातील दुरूस्ती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या दुरूस्तीमुळे पालकांना प्रवेशाच्या शाळेसह आवश्यक कागदपत्रे,शाळेचा पत्ता आदींची माहिती सहज उपलब्ध होणे शक्य

ठळक मुद्दे‘आरटीईतील दुसऱ्या फेरीतील प्रवेशाना विलंब; पालकांमध्ये संताप’ या मथळ्याखाली लोकमतने २७ मे रोजी वृत्तप्रसिध्द याची दखल घेत प्राथमिक शिक्षण संचालनालयाने त्याच दिवशी पत्रक पालकांना ४ जूनपर्यंत ऑनलाईन प्रवेश अर्जात दुरूस्ती

ठाणे : जिल्ह्यातील ६५२ शाळांमध्ये शिक्षणाचा हक्क (आरटीई) या कायद्याखाली आर्थिकदृष्ट्या दुर्बल व मागासवर्गीय कुटुंबातील बालकांच्या प्रवेशासाठी २५ टक्के जागा आरक्षित ठेवल्या आहेत. यानुसार लॉटरी सोडत काढून पहिल्या फेरीचे प्रवेश झाले. त्यातील अनुभव लक्षात घेऊन दुसरी सोडत काढण्यापूर्वी संबंधीत पालकांना ४ जूनपर्यंत ऑनलाईन प्रवेश अर्जात दुरूस्ती करण्याची संधी दिली आहे.‘आरटीईतील दुसऱ्या फेरीतील प्रवेशाना विलंब; पालकांमध्ये संताप’ या मथळ्याखाली लोकमतने २७ मे रोजी वृत्तप्रसिध्द करून प्रशासनास जागे केले. याची दखल घेत प्राथमिक शिक्षण संचालनालयाने त्याच दिवशी पत्रक काढून पालकांना अर्जातील दुरूस्तीची संधी दिली आहे. पहिल्या फेरीतील विविध त्रृटींमुळे बहुतांशी बालकांच्या प्रवेशासाठी समस्या निर्माण झाली. त्यावर मात करण्यासाठी उपाययोजना म्हणून दुसरी सोडत काढण्यापूर्वी पालकांना प्रवेश अर्जातील दुरूस्ती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या दुरूस्तीमुळे पालकांना प्रवेशाच्या शाळेसह आवश्यक कागदपत्रे,शाळेचा पत्ता आदींची माहिती सहज उपलब्ध होणे शक्य आहे.यास अनुसरून पालकांनी अर्ज भरला परंतु ‘कन्फर्म’ केला नसेल तर कन्फर्म करण्याची दुरूस्ती करण्याचे आवाहन केले आहे. याशिवाय लॉटरी लागलेली नसल्यास पालकांनी त्यांचे गूगल लोकेशन चुकले असल्यास ते दुरूस्त करून घेणे आवश्यक आहे. पहिल्या फेरीत लॉटरी लागली . पण अंतराच्या अडचणीमुळे प्रवेश घेऊ शकले नाही, अशाच तक्रारीची खात्री पडताळणी समितीस करून देणे, पालकांची चूक, तांत्रिक चूक असल्याचे गूगल लोकेशन, व शाळा निवडीत दुरूस्ती करणे. यात घराचे अंतर ३ किमीपेक्षा जास्त असतानाही जाणीवपूर्वक १ किमी.च्या आत दाखवले असल्यास आणि अपात्र ठरवले असल्याचे दुरूस्ती करता येणार नसल्याचे मार्गदर्शनही प्रशासनाकडून देण्यात आले आहे.

टॅग्स :thaneठाणेzpजिल्हा परिषदSchoolशाळा