शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

आईवडिलांचे ‘संकल्पपत्र’ घेण्यास मनाई!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 05:44 IST

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या टक्केवारीत भरीव वाढ व्हावी, यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांमध्येदेखील विद्यार्थ्यांद्वारे त्यांच्या आईवडिलांना मतदानाची जाणीव करून देण्यात आली.

- सुरेश लोखंडे ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या टक्केवारीत भरीव वाढ व्हावी, यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांमध्येदेखील विद्यार्थ्यांद्वारे त्यांच्या आईवडिलांना मतदानाची जाणीव करून देण्यात आली. ‘मतदान करणारच’ असे त्यांचे ‘संकल्पपत्र’ स्वाक्षरीसह भरून घेण्यात आले. परंतु, त्यापासून आचारसंहितेचा भंग होत असल्याची जाणीव होताच निवडणूक यंत्रणेने ते पत्र भरून घेण्यास आता मनाई केली आहे. यामुळे जिल्ह्यातील शिक्षकवर्गद्विधा मन:स्थितीत दिसून येत आहे.मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहे. त्यापैकी एक ‘संकल्पपत्र’ हा उपक्रम आहे. जिल्ह्यातील माध्यमिक, प्राथमिक शाळांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनींकडून मतदार आईवडिलांना संकल्पपत्र दिले जात आहे. त्याद्वारे शिक्षण देत असल्याचे आभार मानण्यासह देशाचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी, भारतीय लोकशाही मजबूत करण्यासाठी आपल्या कुटुंबातील १८ वर्षांवरील सर्व मतदारांनी मतदान अवश्य करावे, असा संकल्प करण्याची विनंती या विद्यार्थ्यांकडून आईवडिलांना करण्यात आली. या पत्रास उत्तर म्हणून या लोकसभा निवडणुकीत मी अवश्य मतदान करेन आणि माझ्या परिचितांनाही मतदान करण्यास प्रोत्साहित करेन, असे पालकांचे ‘संकल्पपत्र’ नाव, पत्ता व स्वाक्षरीसह शाळेत जमा करावे लागले. जिल्ह्यातील बहुतांशी शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी हे संकल्पपत्र शाळेत जमा केले आहे. काही विद्यार्थ्यांनी ते अद्याप शाळेत दिले नाही.परंतु, आता विद्यार्थ्यांच्या या संकल्पपत्रास मनाई करण्यात आली आहे. आचारसंहितेचा भंग होत असल्याची जाणीव निवडणूक यंत्रणेस झाली आणि विद्यार्थ्यांकडून मतदानासाठीचे ‘संकल्पपत्र’ घेण्यात येऊ नये, असे जिल्ह्यातील शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आदींना भ्रमणध्वनीद्वारे शिक्षण विभागाने कळवले आहे.>तोंडी आदेशामुळे संभ्रमनिवडणुकीच्या या काळात तोंडी आदेशास स्थान नसल्यामुळे शिक्षकवर्ग गोंधळात सापडला आहे. जिल्ह्याच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ‘संकल्पपत्र’ घेऊ नये, असे दूरध्वनीद्वारे कळवल्याचे मेसेज शिक्षण विभागाने मुख्याध्यापक व शिक्षक यांना कळवले आहे. यामुळे मागील काही दिवसांपासून माध्यमिक व प्राथमिक शाळांच्या विद्यार्थ्यांकडून ‘संकल्पपत्र’ घेण्याचे थांबवून विद्यार्थ्यांद्वारे परिवारातील मतदान जनजागृतीला रोख लागला आहे.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019thane-pcठाणे