आधारवाडी डम्पिंगवर बहरणार नंदनवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2020 12:12 AM2020-10-05T00:12:20+5:302020-10-05T00:12:24+5:30

फुले, फळांची बाग साकारणार : प्रभाग अधिकाऱ्यांनी केली पाहणी

Paradise will flourish on Aadharwadi dumping | आधारवाडी डम्पिंगवर बहरणार नंदनवन

आधारवाडी डम्पिंगवर बहरणार नंदनवन

Next

कल्याण : केडीएमसीच्या बहुचर्चित आधारवाडीतील डम्पिंग ग्राउंडचा कायापालट करण्याचा निर्णय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतला आहे. त्याठिकाणी कर्जत नगरपालिकेच्या धर्तीवर डम्पिंग ग्राउंडवर फुले आणि फळांची बाग साकारण्याचा प्रकल्प राबवला जाणार आहे. यासंदर्भात महापालिकेतील घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्या नेतृत्वाखाली सर्व प्रभागक्षेत्र अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी शनिवारी कर्जत येथील डम्पिंग प्रकल्पाची पाहणी केली. हा प्रकल्प कल्याणमधील आधारवाडी ग्राउंडवर राबवण्यासंदर्भात लवकरच आयुक्तांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष आढावा बैठक होणार आहे.

केडीएमसी परिक्षेत्रातील कचरा कल्याण पश्चिमेतील आधारवाडी डम्पिंग ग्राउंडवर टाकला जातो. हे डम्पिंग बंद करण्यात येणार असले, तरी तारीख प्रशासनाने जाहीर केलेली नाही. या डम्पिंगवर आता कर्जत डम्पिंगच्या धर्तीवर सुंदर बगिचा, फळबाग, फुलबाग उभी करण्यात येणार आहे. कर्जत नगरपालिकेने साडेचार एकर जमिनीच्या डम्पिंग ग्राउंडवर बगिचा फुलविला आहे. यात फळबाग आणि फुलबाग साकारण्यात आली आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त कोकरे यांनी गेल्या आठवड्यात आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांचा कर्जत डम्पिंग पाहणी दौरा केला. शनिवारीही सर्व प्रभाग अधिकाºयांना त्याठिकाणी नेण्यात आले होते. कल्याणमधील डम्पिंगवर कर्जत येथील डम्पिंग ग्राउंडवर असणाºया उद्यानाप्रमाणे बाग फुलविण्याचा केडीएमसी प्रशासनाचा मानस आहे.

काही दिवसांत आधारवाडी डम्पिंगचे सपाटीकरण झाल्यावर फळे, फुले, भाजीपाला मळा साकारण्याबाबत प्रस्ताव बनविला जाणार आहे. महापालिका आयुक्त सूर्यवंशी यांच्या दालनात लवकरच अधिकाºयांची आढावा बैठक घेऊ न पुढील धोरण ठरवू, अशी माहिती कोकरे यांनी दिली.

काय आहे नेमका कर्जत पॅटर्न?
साडेचार एकर जमिनीवर शहरातून वर्गीकरण करून सुका आणि ओला कचरा आणला जातो. त्यावर प्रक्रिया करून विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. शहरातील कचरा कसा गोळा करावा, कचरा गोळा केल्यावर त्याच्यावर प्रक्रिया कशी करू शकतो, आलेल्या कचºयातून उत्पन्न कसे वाढू शकते आणि रोजगार कसा देऊ शकतो, याचे मॉडेल कर्जत नगरपालिकेने राबवले आहे.

Web Title: Paradise will flourish on Aadharwadi dumping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.