भूसुरुंग स्फोटाने खापरीच्या ग्रामस्थांमध्ये घबराट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 12:19 AM2020-02-22T00:19:25+5:302020-02-22T00:19:32+5:30

खदाण बंद करण्याची मागणी : डोळखांब-टोकावडे-म्हसा रस्त्याचे काम सुरू

Panic erupts in Khapri villagers with a blast | भूसुरुंग स्फोटाने खापरीच्या ग्रामस्थांमध्ये घबराट

भूसुरुंग स्फोटाने खापरीच्या ग्रामस्थांमध्ये घबराट

Next

मुरबाड : डोळखांब- टोकावडे-म्हसा रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम गेल्या वर्षीपासून सुरू आहे. गुजरातमधील एका कंपनीला कंत्राट दिले आहे. रस्त्यासाठी लागणारी खडी, डांबर प्लान्ट, आरएमसी प्लान्ट खापरी येथे सुरू केला असून दगडखदाण सुरू आहे. परंतु, ही खदाण खापरी गावापासून अगदी ५०० फुटांवर आहे. दगड काढण्यासाठी स्फोट केले जात असल्याने खापरी व कामतपाडा, कातकरीवाडी, वैतागवाडीला हादरे बसू लागल्याने ग्रामस्थ संतप्त झाले.

आवश्यक त्या परवानगी ग्रामपंचायतीला अंधारात ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयातून घेतल्याचे उघड झाले आहे. ही खदाण जिल्हाधिकाऱ्यांनी बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. कंपनीने मशिनरी ठेवण्याच्या नावाखाली खापरीत जागा घेतली. मात्र, तेथे डांबर प्लान्ट, खडी मशीन बसवली. परंतु, यासाठी खडीची गरज असल्याने गावापासून अगदी ५०० मीटरवर दगडखदाण सुरू केली. खापरी हे गाव पेसा क्षेत्रात येत असल्याने गौण खनिजाचा व्यापारीदृष्टीने वापर करण्यास परवानगी देण्यापूर्वी संबंधित ग्रामसभेची परवानगी खनिजकर्म विभागाने मागवणे आवश्यक होते. मात्र, या विभागाने व जिल्हाधिकाºयांनी खापरीच्या ग्रामस्थांना अंधारात ठेवून परस्पर कंत्राटदाराला परवानगी दिली. दगडखाणीपासून १०० फुटांवर कनकवीरा नदी व नदीवर चार ते पाच सिमेंटचे बंधारे आहेत. नदीचे पाणी प्रदूषित झाले आहे. शेतकºयांनी पिकवलेल्या भेंडीवर धूळ, डांबराचे थर साचले आहेत.
या खदाणीत केल्या जात असलेल्या स्फोटांची तीव्रता भयंकर असल्याने खापरी व परिसरातील वाड्यांना हादरे बसून घरांना तडे गेले आहेत.
ही खदाण बंद करावी म्हणून वर्षभरापासून ग्रामपंचायतीपासून ते तहसील कार्यालयात तक्र ार देऊनही कारवाई होत नसल्याने ग्रामसभेत ग्रामस्थांनी ग्रामसेवक व सरपंचांना धारेवर धरले. शेवटी, सर्व ग्रामस्थांनी ठराव घेऊन ही दगडखाण बंद करण्याची मागणी केली.प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

जिल्हाधिकाºयांच्या कानावर घालू
याबाबत तहसीलदार अमोल कदम यांनी सांगितले की, खापरी ग्रामपंचायतीने खदाण बंद करण्याबाबत अर्ज दिला आहे. परंतु, खदाणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून परवानगी दिली आहे. त्यामुळे आलेला अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात तत्काळ पाठवण्यात येईल.
 

Web Title: Panic erupts in Khapri villagers with a blast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे