शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

पंचायत समिती सभापतीपद :भिवंडी, कल्याण ठरणार निर्णायक; मुरबाड भाजपाकडे, शहापूर-अंबरनाथ शिवसेनेकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2018 2:19 AM

भिवंडीत शिवसेना, भाजपाचे समसमान असलेले बळ आणि काँग्रेस, राष्ट्रवादीला आलेले अनन्यसाधारण महत्त्व यामुळे भिवंडी पंचायत समितीच्या सभापतीपदाची सोमवारी होणारी निवडणूक निर्णायक ठरणार आहे.

ठाणे : भिवंडीत शिवसेना, भाजपाचे समसमान असलेले बळ आणि काँग्रेस, राष्ट्रवादीला आलेले अनन्यसाधारण महत्त्व यामुळे भिवंडी पंचायत समितीच्या सभापतीपदाची सोमवारी होणारी निवडणूक निर्णायक ठरणार आहे. कल्याणमध्येही तशीच परिस्थिती निर्माण झाली असून शिवसेनेसोबत जाणाºया राष्ट्रवादीला पदांची आॅफर देत भाजपाने राजकीय उलथापालथीची तयारी केली आहे.सध्याच्या संख्याबळानुसार भिवंडी आणि कल्याणमध्येच शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेसला सांभाळण्याची कसरत करावी लागेल. पण अंबरनाथ, शहापूरमध्ये शिवसेनेची सत्ता येईल. एकमेव मुरबाड पंचायत समितीमध्ये भाजपाची सत्ता येईल. या निवडणुकीवर जिल्हा परिषदेचे चित्र अवलंबून आहे.कल्याणला राष्ट्रवादीही रिंगणात-कल्याण : कल्याण पंचायत समितीत शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपाने राष्ट्रवादीला पदांची आॅफर दिली आहे. राष्ट्रवादीने सभापतीपदावरीलदावा सोडलेला नाही.शिवसेनेकडून रमेश बांगर, तर राष्ट्रवादीतर्फे भाऊ गोंधळी इच्छुक आहेत. शिवसेनेला रोखण्यासाठी राष्ट्रवादीला मागेल तेपद देण्याची तयारी भाजपाने दाखवल्याने ही निवडणूक चुरशीची होईल.पंचायतीच्या १२ जागांपैकी भाजपाकडे पाच, शिवसेनेकडे चार आणि राष्ट्रवादीकडे तीन जागा आहेत.भिवंडीत काँग्रेस,मनसेवर लक्षभिवंडी : भिवंडीच्या ४२ जागांपैकी शिवसेना, भाजपाकडे प्रत्येकी १९ जागा आहेत. राष्ट्रवादीकडे एक जागा असली, तरी त्या पक्षाने जिल्हा परिषदेतील पदांच्या गणितासाठी शिवेसनेला पाठिंबा देण्याचे धोरण ठेवले आहे. त्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ २० झाले आहे.भिवंडी महापालिका निवडणुकीत केलेल्या मदतीच्या बदल्यात काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा दिला किंवा तो पक्ष तटस्थ राहिला तरी शिवसेनेला सभापतीपद मिळू शकते. त्या पक्षाकडे दोन सदस्य आहेत. मनसेच्या एकमेव सदस्याने पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव सांगत आपला निर्णय जाहीर केलेला नाही. पण निवडणूक लढवताना तो पक्ष महायुतीत सहभागी असल्याने त्याचा पाठिंबा शिवेसनेला मिळेल, असे मानले जाते.भाजपाने काँग्रेसच्या तालुका पदाधिकाºयांच्या मध्यस्थीने त्यांचे सदस्य फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु माजी खासदार सुरेश टावरे यांनी त्याचा इन्कार केला.भाजपाला मतदान करू नये, असा व्हिप पक्षाने काढला. सभापतीपदासाठी शिवसेनेत वेहळे गावातील विद्या थळे यांचे नाव पुढे आहे. थेट पाठिंबा दिल्यास उपसभापतीपद काँग्रेसला दिले जाईल. अन्यथा ते राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे. भाजपाने सभापती आणि उपसभापतीपदासाठी रवीना रवींद्र जाधव,नमिता नीलेश गुरव व ललिता प्रताप पाटील यांच्या नावाची तयारी केली आहे.अंबरनाथलास्वप्नाली भोईर-अंबरनाथ : अंबरनाथ पंचायतीच्या आठपैकी सात जागा शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीने मिळवल्याने सभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या स्वप्नाली भोईर यांचीच बिनविरोध निवड होईल.विरोधी पक्षाकडे उमेदवार नसल्याने, भाजपाचा एकच उमेदावर विजयी झाल्याने भोईर यांचा मार्ग सोपा झाला आहे. ओबीसी महिलांसाठी आरक्षण असल्याने शिवसेनेकडे दोन उमेदवार पुढे आले होते. त्यातील चोण गणातील विजयी उमेदवार स्वप्नाली भोईर यांचे नाव आघाडीवर आहे. पहिले सव्वा वर्ष भोईर यांना सभापतीपद दिले जाईल. त्यानंतर नेवाळी भागातील उमेदवारांपैकी एकाला हे पद दिले जाणार आहे.मुरबाडमध्ये दोन दावेदारमुरबाड : माळ गणातून निवडून आलेले दत्तू गणपत वाघ आणि म्हसा गणातून निवडून आलेले जनार्दन पादीर यांच्यात मुरबाडच्या सभापतीपदासाठी चुरस आहे. उपसभापती पदासाठी कुडवली गणातील चंद्रकांत सासे व वैशाखरे गणातील सीमा अनील घरत दावेदार असल्याची चर्चा आहे. १६ पैकी ११ जागा जिंकल्याने या पंचायतीवर भाजपाचे वर्चस्व आहे. आमदार किसन कथोरे यांच्या प्रयत्नाने स्पष्ट बहुमत मिळाल्याने ते सांगतील, तोच सभापती व उपसभापती होणार आहे.शहापुरात शिवसेनेतच रस्सीखेचशहापूर : शहापूरचे सभापतीपद अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव आहे आणि शिवसेनेच्या सहा महिला सदस्य त्यासाठी इच्छुक असल्याने तीव्र चुरस आहे. शहापूरच्या २८ पैकी १८ जागा शिवसेनेने जिंकल्या आहेत. येथे राष्ट्रवादीशी आघाडी न झाल्याने सर्व पदे शिवसेनेकडेच असतील. साकडबाव गणातील यशोदा आवटे या सभापती होतील, असा अंदाज आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकthaneठाणेpanchayat samitiपंचायत समिती