शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
7
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
8
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
9
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
10
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
11
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
12
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
13
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
15
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
16
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
17
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
18
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
19
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
20
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली

‘पाम’द्वारे करा बेशिस्त रिक्षाचालकांच्या तक्रारी; दोषींना बसणार चाप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2020 00:14 IST

‘प्रोटेस्ट अगेन्स्ट ऑटोवाला’ची निर्मिती : आरटीओला दिली माहिती

अनिकेत घमंडी डोंबिवली : रिक्षाचालकांकडून होणारी जादाभाडे आकारणी, मीटर न टाकणे, उद्धट वर्तन, यामुळे प्रवासी हैराण झाले आहेत; पण याबाबत नेमकी तक्रार कोणाकडे करायची, दाद कोणाकडे मागायची, याबाबत मात्र प्रवाशांमध्ये जनजागृतीचा अभाव दिसून येतो. काही दक्ष नागरिक वाहतूक पोलीस वा आरटीओकडे तक्रारी, ई-मेल करतात; पण अशा नागरिकांचे प्रमाण अत्यल्प आहे. प्रवाशांना तक्रार करणे सोपे व्हावे, यासाठी प्रोटेस्ट अगेन्स्ट आॅटोवाला या मंचने ‘पाम’ या अ‍ॅपची निर्मिती केली असून, ते विनामूल्य तत्त्वावर उपलब्ध होणार आहे.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर २५ मार्चला या अ‍ॅपचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती मंचच्या सदस्यांनी दिली. कल्याण येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांची सोमवारी मंचच्या सदस्यांनी भेट घेतली. त्या वेळी त्यांना या अ‍ॅप बाबाबत माहिती देण्यात आली. या अ‍ॅपमुळे प्रवाशांची तक्रार अधिक जलदतेने आरटीओपर्यंत पोहोचेल आणि दोषी रिक्षाचालकांवर चाप बसेल, परिस्थिती नियंत्रणात राहील, असा उद्देश असल्याचे अधिकाऱ्यांना सांगण्यात आले. मंचचे सचिन गवळी, प्रमोद काणे, अल्पा खोना आदीनी यासंदर्भात भेट घेतली होती. हा अ‍ॅप तयार करण्यासाठी नवी मुंबई येथील तुषार बापटे यांनी सहकार्य केल्याची माहिती गवळी यांनी दिली. या संदर्भात वाहतूक नियंत्रण विभागाचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले. अनेकदा अन्यायाला वाचा फोडण्याची इच्छा असतानाही प्रवाशांना ई-मेल करण्याचा कंटाळा, तो कसा करावा, त्यात काय नमूद करावे या तांत्रिक बाबी किचकट वाटल्याने, अथवा त्यामध्ये वेळ जात असल्याने तो जास्त पसंतीस येत नसल्याचे मंचच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे अत्याधुनिक तंत्रप्रणालीनुसार अ‍ॅप संकल्पनेतून ‘पाम’ अ‍ॅप तयार केल्याचे सांगण्यात आले. याआधी प्रवाशांना तक्रारीसाठी दिलेल्या ई-मेलसंदर्भात या वेळी माहिती घेण्यात आली. तो ई-मेल वापरात आहे की नाही, याची माहिती घ्यावी, त्यावर किती तक्रारी आल्या, त्यापैकी किती आताच्या आहेत, त्याची माहिती घेण्यासंदर्भात पाटील यांनी सहकाऱ्यांना सूचना दिल्या.अ‍ॅपद्वारे कशी करायची तक्रारज्या रिक्षाचालकासंदर्भात प्रवाशांना तक्रार आहे, त्यांनी संबंधित रिक्षाचा नंबर दिसेल असा फोटो, जमल्यास रिक्षाचालकाचा फोटो, तक्रारीचे स्वरूप, दिनांक, वेळ, ठिकाण, शक्य असल्यास व्हिडीओ असा तपशील अ‍ॅपवर द्यावा. तो देताच तातडीने आरटीओकडे ती तक्रार पोहोचेल आणि उपद्रवी रिक्षाचालकांना शिस्त लावण्याच्या दृष्टीने हालचाली होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले.आरटीओची हेल्पलाइन बंद?आरटीओकडे थेट तक्रार करण्यासंदर्भात दिलेला हेल्पलाइन नंबर अनेक वर्षांपासून बंद आहे, त्याबाबतही आरटीओ अधिकाºयांनी लक्ष घालावे, त्या क्रमांकाचे काय झाले, तसेच नवा क्रमांक देण्यात येणार आहे का? असल्यास तो जाहीर करावा, अशी मागणी ‘पाम’ने केली. त्यावर पाटील यांनी माहिती घेऊन योग्य ती सुधारणा करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षा