शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात पुन्हा एकदा मोदी सरकार, पण ४०० पार नाही जाणार, एक्झिट पोलचा अंदाज 
2
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: महाराष्ट्राचे आकडे आले! महायुती पुढे, पण फक्त एका जागेने
3
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
4
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
5
मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?
6
Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!
7
शेवटच्या क्षणी काँग्रेसने विचार बदलला; 'एक्झिट पोल'बाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
8
‘इंडिया’ आघाडी २९५ हून अधिक जागा जिंकेल, एक्झिट पोलचे आकडे येण्यापूर्वी खर्गेंचा मोठा दावा 
9
केजरीवालांना उद्या सरेंडर व्हावे लागणार; कोर्ट अंतरिम जामिनावर ५ जूनला निकाल देणार 
10
शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबत तटकरेंचा खळबळजनक दावा; मात्र अजित पवार म्हणाले...
11
मतदानानंतरची रणनीती ठरवण्यासाठी इंडिया आघाडीची बैठक, हे बडे नेते अनुपस्थित   
12
४ तारखेला निकाल, ५ जूनला केंद्रीय मंत्रिमंडळाला राष्ट्रपतींकडून डिनरचे निमंत्रण
13
लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलवर EC ची मोठी घोषणा; "संध्याकाळी ६.३० वाजण्यापूर्वी..."
14
"थोडं थांबा, ४ जूननंतर कुठे रांग लागते हे..."; सुनील तटकरेंच्या दाव्यावर शरद पवार गटाचं प्रत्युत्तर
15
"एका समाजासाठी काम करत असाल तर..."; अमोल मिटकरींचा मेधा कुलकर्णींवर पलटवार
16
रणवीर शिवाय डिनरला गेली दीपिका पादुकोण, अभिनेत्रीच्या बेबी बंपपेक्षा केअर टेकरने वेधलं सर्वांचं लक्ष
17
"मोदींच्या साधनेमुळे वातावरण सुधारले, उष्णतेपासून दिलासा मिळाला’’, रवी किशन यांनी केला दावा  
18
बदललेले रक्त बिल्डर 'बाळा'च्या आईचे? आज मोठा खुलासा होणार, पोलिसांना लीड मिळाले...
19
भाजपा स्वबळावर जिंकू शकत नाही, ... एवढी बेगमी ते करतील; लोकसभा निकालावर भाकीत
20
Punjab National Bank : 'या' सरकारी बँकेतून लोन घेणं महागणार, वाढणार EMI; पाहा किती झाला Interest Rate?

ठाणेसह पालघरच्या अर्धवेळ शिक्षकांचे बंद केलेल्या दिवसापासून वेतन सुरू ; न्यायालयाच्या अंतरिम आदेशाने दिवाळी गोड !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2018 5:45 PM

शिक्षण विभागाने दोन वर्षांपूर्वी ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील सुमारे ५० अर्धवेळ शिक्षकांचे पगार बंद केले होते. या सर्व शिक्षकांना एकत्र करून शिक्षक सेना प्रांताध्यक्ष ज .मो. अभ्यंकर, यांच्या आदेशान्वये मुंबई उच्च न्यायालयात मी दाद मागितली. त्यास अनुसरून शिक्षण विभागाला चांगलेच धारेवर धरत ज्या दिवसापसून वेतन बंद केले, त्यादिवसापासून तत्काळ वेतन सुरू करा, असा अंतरिम आदेश न्यायालयाने बुधवारी दिला

ठळक मुद्दे ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील सुमारे ५० अर्धवेळ शिक्षकांचे पगार बंद केले होते.मुंबई हायकोर्टाचे वकील शेख यांचे शुल्क ४५ हजार रूपये देण्याची देखील ऐपत  नव्हती. ती शुल्क मी स्वत: भरून५० अर्धवेळ शिक्षकांना ऐन दिवाळीत न्याय मिळवून दिल्याचे समाधान

ठाणे : शासनाच्या तांत्रिक त्रृटीमुळे संचमान्यतेत अर्धवेळ शिक्षकाचे पद दिसत नव्हते. यामुळे शिक्षण विभागाने दोन वर्षांपूर्वी ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील सुमारे ५० अर्धवेळ शिक्षकांचे पगार बंद केले होते. या सर्व शिक्षकांना एकत्र करून शिक्षक सेना प्रांताध्यक्ष ज .मो. अभ्यंकर, यांच्या आदेशान्वये मुंबई उच्च न्यायालयात मी दाद मागितली. त्यास अनुसरून शिक्षण विभागाला चांगलेच धारेवर धरत ज्या दिवसापसून वेतन बंद केले, त्यादिवसापासून तत्काळ वेतन सुरू करा, असा अंतरिम आदेश न्यायालयाने बुधवारी दिला, असे शिक्षक सेना कोकण विभाग अध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी लोकमतला सांगितले. यामुळे दिवाळी आधीच या अर्धवेळ शिक्षकांची दिवाळी गोड होऊन त्यांच्या आनंदोत्सव व्यक्त केला जात आहे.कार्यरत असलेल्या या अर्धवेळ शिक्षकांना वेतन मिळावे यांनी प्रारंभी शिक्षण शिक्षणाधिकारी , उपसंचालक , शिक्षण संचालक , शिक्षण सचिव आदी अधिकाऱ्यांचे उंबरठे झिंजवले. पण या शिक्षकांवरील कोणीही अन्याय दूर केला नाही. यामुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या या शिक्षकांपैकी बहुतांशी शिक्षकांनी इडली विकून तर काहींनी पेपर विकून उदरनिर्वाह केला. त्यांच्या वरील हा अन्याय दूर करण्यासाठी न्यायालयीन दरवाजे थोटावण्याचा प्रसंग उद्भवला. मात्र त्यांच्याकडे मुंबई हायकोर्टाचे वकील शेख यांचे शुल्क ४५ हजार रूपये देण्याची देखील ऐपत  नव्हती. ती शुल्क मी स्वत: भरून या ५० अर्धवेळ शिक्षकांना ऐन दिवाळीत न्याय मिळवून दिल्याचे समाधान म्हात्रे यांनी व्यक्त केले.शिक्षण विभागाच्या निष्काळी व दुर्लक्षितपणामुळे अचानक पगार बंद झाल्याने या शिक्षकांवर आर्थिक संकट ओढावले होते. सर्वांवर आले होते. म्हात्रे, यांनी आमच्या नोटीसचे पैसे ४५ हजार रूपये कोर्टामध्ये भरून रिट पिटीशन दाखल केली. त्यास प्राप्त झालेल्या यशामुळे आमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून दोन वर्षांनंतर आता कुठे तरी आम्ही सर्वजन दिवाळी साजरी करणार असल्याचे अर्धवेळ शिक्षकाच्या बाजूने विलास आंब्रे यांनी स्पष्ट केले. यासाठी या आर्थिक संकट प्रसंगी अभ्यंकर यांच्यासह आमदार बालाजी किणीकर, दलीप राजे आदींसह ठाणे पालघरमधील सुमारे २१ शिक्षकांचे देखील आम्ही आभारी असल्याचे आंबे्र यांनी सांगितले.------------

टॅग्स :thaneठाणेCourtन्यायालय