शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

‘सेना-भाजपामुळे पालघरचा विकास मृत्युपंथाला’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 01:12 IST

राज्याचे मुख्यमंत्री हे निरव मोदी, विजय मल्ल्या यांचे राजकीय रूप आहे.

पालघर : चार वर्षांत विकासाची कोणतीही कामे केली नाहीत त्यामुळेच मृत व्यक्तींचा वापर करण्याची वेळ भाजपा आणि शिवसेनेवर आली आहे. एकीकडे पालघर जिल्ह्याचा विकास हा सत्ताधाऱ्यांमुळे मरणासन्न अवस्थेत असून दुसरीकडे भाजपा-शिवसेना हे दोन्ही पक्ष ऊर बडवून मतांचा जोगवा मागत आहेत, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली.पालघर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत सावंत म्हणाले की, समृद्धी महामार्ग व नाणारच्या शेतकºयांना फसवल्यानंतर आता यांचा डोळा इथल्या लोकांच्या जमिनीवर आहे. ही निवडणूक साधू विरुद्ध संधीसाधू, निष्ठावंत विरुद्ध गद्दार, नीती विरुद्ध अनीती आणि सत्य विरुद्ध असत्य अशी आहे. पालघरवासीय भाजपा, शिवसेना व बहुजन विकास आघाडी या तिन्ही सत्ताधाºयांचा आणि दलबदलूंचा वचपा काढल्याशिवाय राहणार नाही आणि जनसेवेचे व्रत घेतलेल्या दामू शिंगडा यांना विजयी करतील, असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री कल्याण-डोंबिवली, भिवंडी, पेण या ठिकाणी वाँटेड आहेत. कल्याण-डोंबिवलीकर आमचे साडेसहा हजार कोटी कुठे गेले? आणि पेणवासीय पेण अर्बन बँकेकडे तारण असलेल्या जमिनी सिडको कधी विकत घेणार, याकरिता मुख्यमंत्र्यांचा शोध घेत असल्याचे सावंत म्हणाले.मुख्यमंत्री निरव मोदी व विजय मल्ल्याचे राजकीय अवतारराज्याच्या मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका करताना सावंत म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री हे निरव मोदी, विजय मल्ल्या यांचे राजकीय रूप आहे. मोदी, मल्ल्या या मंडळींनी ज्याप्रमाणे आमिषे दाखवून बँकांचे पैसे लुबाडून पोबारा केला, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री निवडणूक आली की आश्वासनांची खैरात करून सर्वसामान्यांची मते लुबाडून त्यांची फसवणूक करून पोबारा करतात.

टॅग्स :Palghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018BJPभाजपा