शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 18:30 IST

प्रशासनाने हा पूल खुला केला खरा, पण यापूर्वी जी काळजी घ्यायला हवी होती, ती घेतल्याचे दिसत नाही. याशिवाय, ज्या पुढाऱ्यांनी कुठलाही गाजावाजा न करता, अत्यंत गोपनियता पाळून या पुलाचे उद्घाटन केले, त्यांनीही याकडे लक्ष दिलेले दिसत नाही...

ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या रस्त्यांपैकी एक म्हणजे कल्याण शीळ रस्ता. या रस्त्यावरील वाहतूक कोंडी, हा कायमच वादाचा आणि चर्चेचा विषय राहत आला आहे. या मार्गावरील, गेल्या अनेक वर्षांपासून काम सुरू असलेला पलावा जंक्शन पूल अखेर शुक्रवारी प्रवाशांसाठी खुला करण्यात आला. मात्र याची अवस्था अत्यंत बिकट आहे. हा पूल खुला झाल्यानंतर, काही वेळातच यावर दुचाकी अपघात होऊन दुचाकीस्वार पडल्याच्या घटना घडल्या. या नंतर, आता प्रवाशांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. काम अर्धवट असताना, पुल का खुला करण्यात आला? या अपघातांच्या घटनांनंतर तरी प्रशासनाला जाग येणार का? महापालिका निवडणुकीच्या पाश्वभूमीवर तर हा निर्णय घेण्यात आला नाही ना, असे नाना प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केले जात आहेत.

...तर पहिल्याच दिवशी दुचाकींचे जे अपघात झाले ते टळले असते -प्रशासनाने हा पूल खुला केला खरा, पण यापूर्वी जी काळजी घ्यायला हवी होती, ती घेतल्याचे दिसत नाही. याशिवाय, ज्या पुढाऱ्यांनी कुठलाही गाजावाजा न करता, अत्यंत गोपनियता पाळून या पुलाचे उद्घाटन केले, त्यांनीही याकडे लक्ष दिलेले दिसत नाही. खरे तर प्रशासनाने पूल खुला करण्यापूर्वी काळजी घेतली असती आणि उद्घाटन करणाऱ्या पुढाऱ्यांनी तो खुला करण्यायोग्य आहे की नाही, याची शहानिशा केली असती, तर पहिल्याच दिवशी दुचाकींचे जे अपघात झाले ते टळले असते.

अशा रस्त्यावरील अपघातांपेक्षा वाहतुककोंडी परवडली -या पुलाची अवस्था अत्यंत बिकट आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर कच आणि बारीक खडी दिसत आहे. पाऊस पडला की, उतारावरच रस्ता निसरडा होत आहे. यामुळे वाहने स्लीप होऊन मोठ्या अपघातांचीशी शक्यता नाकारता येत नाही. महत्वाचे म्हणजे, या पुलाचे काम अर्धवट असताना तो खुला करणे महत्वाचे होते की, लोकांचा जीव महत्वाचा आहे? असा प्रश्न उपस्थित करत, अशा रस्त्यावरील अपघातांपेक्षा वाहतुककोंडी परवडली, असे प्रवासी म्हणत आहे. एवढेच नाही तर, चोवीस तासांच्या आतच या पूलाची अशी अवस्था असेल, तर एक वर्षानंर कशी स्थिती असले? असा प्रश्नही प्रवासी विचारत आहेत. यामुळे आता तरी प्रशासनाला जाग येणार का? लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती होऊन प्रवाशांची समस्या सुटणार का? हे बघावे लागेल.  

पूल खुला केला, पण वाहने स्लीप होऊ लागली... -तत्पूर्वी, एरवी प्रत्येक उद्घाटनाचा गाजावाजा करणाऱ्या सत्ताधारी पक्षाने पलावा पुलाचे उद्घाटन करताना काहीसा सस्पेन्स राखला होता, शुक्रवारी सकाळच्या सुमारास शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आणि काही निवडक पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये हा पूल नागरिकांसाठी खुला करण्यात आला. मात्र, यावरून वाहने स्लीप होऊ लागले. यामुळे दुपारच्या वेळी हा पुल बंद करण्याचीही वेळ आली होती.

टॅग्स :thaneठाणेpassengerप्रवासीAccidentअपघात