शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णांसाठी चित्रकला स्पर्धा; कोविड रुग्णालयात अनोख्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 02:28 IST

यंदाचा गणेशोत्सव हा अनेक नियमांचे पालन करून साजरा केला जात आहे. शहरातील नागरिकही आपल्या कुटुंबीयांसमवेत साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करत आहेत.

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेच्या कोविड रुग्णालयात दाखल असलेले रुग्ण आणि त्या ठिकाणी सेवा देणारे डॉक्टर आणि इतर कर्मचारी यांनी अनोख्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला. यावेळी रुग्णांसाठी गणेश उत्सवाच्या अनुषंगाने चित्रकला स्पर्धा घेण्यात आली आणि रुग्णांनी मोठ्या आवडीने या स्पर्धेत सहभाग घेतला.

अंबरनाथमध्ये पालिकेद्वारे दंत महाविद्यालयात सुरू करण्यात आलेल्या कोविड रुग्णालयामधील रुग्णांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने आयोजित चित्रकला स्पर्धेत सहभाग घेऊन कोरोनामुळे अंधारमय झालेल्या आपल्या भविष्यात अनेक रंग भरले. रुग्णालयात सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी एकूण ८१ रुग्णांनी चित्रकला स्पर्धेत भाग घेतला होता. रुग्णांनी कोरोनाची भीती दूर सारत विविध चित्रे रेखाटत स्पर्धेचा आनंद लुटला.

यंदाचा गणेशोत्सव हा अनेक नियमांचे पालन करून साजरा केला जात आहे. शहरातील नागरिकही आपल्या कुटुंबीयांसमवेत साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करत आहेत. परंतु, ज्या नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे आणि त्यांच्यावर नगरपालिकेच्या कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहेत, त्यांना एकाकीपणा वाटू नये आणि त्यांनीही गणेशोत्सवाचा आनंद घ्यावा, या हेतूने रुग्णालयातील डॉक्टरांनी सर्व रुग्णांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम सर्वांनी रुग्णालयात असणाऱ्या गणेशमूर्तीचे पूजन व आरती केली आणि त्यानंतर स्पर्धेत सर्व वयोगटांतील रुग्णांनी अगदी आनंदाने भाग घेतला. यातील सर्वात कुतूहलाची गोष्ट म्हणजे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ७० वर्षांच्या आजींनीही सहभाग नोंदवला आणि बक्षीसही पटकावले. रुग्णालयात गणेशाची मूर्ती असून त्या मूर्तीचे दररोज पूजनही केले जात आहे. रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचारी मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी गणेशाची आरती करतात. गणेशोत्सवाच्या निमित्ताने रुग्णालयाला भक्तीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.अनेक भाविक हे गणेशोत्सवात मग्न असतात. त्यातील काही भाविक कोरोनामुळे रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्या भक्तीचा मार्ग मोकळा करून देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. केवळ स्पर्धेच्या माध्यमातून रुग्णालयात भक्तिमय वातावरण निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न होता. - प्रशांत रसाळ, मुख्याधिकारी

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसGanesh Mahotsavगणेशोत्सव