शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानात भिवंडीतील पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ठाणे जिल्ह्यात प्रथम

By नितीन पंडित | Updated: March 5, 2024 18:10 IST

या शाळेने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: राज्य शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजने अंतर्गत राबविलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानात राज्यात सर्वाधिक शाळा असलेल्या ठाणे जिल्ह्यात भिवंडी शहरातील पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाने बाजी मारली असून या शाळेने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

१ जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व खाजगी संस्थांच्या शाळा अशा दोन गटात शाळांमध्ये राबविण्यात आले.ठाणे जिल्हा हा सर्वाधिक शाळांची संख्या असलेला जिल्हा आहे, त्यामुळे या जिल्ह्यात ही स्पर्धा अटीतटीची झाली.यामध्ये पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालयाने बाजी मारली आहे.

सध्या मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्येला गळती लागलेली असताना भिवंडी शहरातील पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आजही ३१२० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.स्पर्धेतील सर्व विषयांच्या गुणांकनात केंद्रस्तर, तालुकास्तर व जिल्हा स्तर या तीनही स्तरावर शाळेने प्रथम स्थान मिळवले आहे.संस्थेचे अध्यक्ष विजय जाधव,उपाध्यक्षा अरुणा जाधव,शाळा समिती चेअरमन श्रीराम भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे मुख्याध्यापक सुधीर घागस तसेच उपमुख्याध्यापक,  पर्यवेक्षक व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पालक व विद्यार्थ्यांच्या सहभागातून हे अभियान यशस्वीरित्या पार पाडले.

शासनाने ठरवून दिलेले सर्व निकष भविष्यातही सुरू ठेवून ते जास्तीत जास्त प्रभावी करण्याचा,विद्यार्थ्यांची गुणवत्ता अधिकाधिक वाढवण्याचा तसेच शैक्षणिक दर्जा उंचावण्याचा प्रयत्न सातत्याने करणार असल्याचे मुख्याध्यापक सुधीर घागस यांनी सांगितले.शाळेच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

टॅग्स :BhiwandiभिवंडीSchoolशाळा