शहरं
Join us  
Trending Stories
1
BJP New President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष महिला? निर्मला सितारामन यांच्यासह 'ही' ३ नावे चर्चेत!
2
One Big Beautiful Bill Passed : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, अमेरिकेच्या संसदेत 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; नेमकं काय आहे यात?
3
Today Daily Horoscope: कोणत्या राशीला आज धनलाभाचा योग? जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
4
‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ विजेत्या गावांना प्रत्येकी २५ लाख; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची घोषणा
5
रायकर पाड्यातील विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्यासाठी जीवघेणा प्रवास; वैतरणा नदी तराफ्यावरून करावी लागते पार
6
पुणे हादरले : घरात घुसून तरुणीवर बलात्कार, तिच्याच मोबाइलवर काढले फोटो ; संगणक अभियंता तरुणी राहात होती उच्चभ्रू सोसायटीत
7
उद्धव-राज : जुन्या जखमांचा हिशेब कसा होणार?
8
यूपीतील शेतकऱ्यांच्या नावे नांदेडमध्ये पीक विमा; ४० सुविधा केंद्र चालकांवर गुन्हा; त्यात ९ जण परळीचे
9
दलाई लामांना ड्रॅगन-विळखा
10
कार चालकाची चूक असल्यास भरपाई मिळणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने दिले निर्देश
11
लंडनची डॉक्टर मैत्रीण पोलिसांच्या रडारवर; दादरमधील अत्याचार प्रकरणातील शिक्षिकेच्या वैद्यकीय चाचण्या पूर्ण; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
12
बनावट लेटरहेडद्वारे आमदार निधी लाटल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल; आ. प्रसाद लाड यांच्या तक्रारीवरून तपास सुरू
13
टेस्टमध्ये फुटबॉलचं ट्विस्ट! हॅरी ब्रूकनं खांद्यानं उडवला स्टंपवरचा चेंडू; आधी पंतनं केली टाइमपास करतोय अशी तक्रार, मग...
14
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
15
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
16
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
17
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
18
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
19
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
20
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा

‘प्लाझा’ सेंटरमधील ऑक्सिजन साठा संपल्याने ‘ग्लोबल’ वरील वाढला ताण, नागरिक व्होल्टास कोविड सेंटर सुरू होण्याच्या प्रतीक्षेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2021 01:21 IST

Oxygen ; ठाणे शहरात ९४ हजार २६ रुग्ण कोरोनाबाधित झाले आहेत, तर आतापर्यंत ७७ हजार ३८९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

ठाणे : महापालिकेच्या पार्किंग प्लाझा कोविड सेंटरमधील ऑक्सिजनचा साठा अखेर संपला असल्याचे महापालिकेने मान्य केले आहे. परंतु शनिवारी रात्री वेळीच रुग्णांना हलविण्यात आले नसते तर वाईट परिस्थिती ओढावली असती. त्यामुळे पालिकेचे त्यासाठी कौतुक करावे लागणार आहे. परंतु आता पार्किंग प्लाझा येथील रुग्ण ग्लोबलला हलविण्यात आल्याने तेथेही ताण वाढला आहे.     तसेच तेथील ऑक्सिजनची क्षमताही कमी होऊ लागली आहे. दुसरीकडे ऑक्सिजनचा साठा उपलब्ध नसल्याने महापालिकेचे व्होल्टास येथील कोविड सेंटरही अद्याप सुरू करण्यात आले नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने यात लक्ष घालून महापालिकेला आवश्यक असलेला ऑक्सिजनचा साठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.ठाणे शहरात ९४ हजार २६ रुग्ण कोरोनाबाधित झाले आहेत, तर आतापर्यंत ७७ हजार ३८९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. एक हजार ४६४ रुग्णांचा मृत्यू झाला असून, सध्याच्या घडीला १५ हजार १९७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या रुग्णांवर उपचार करण्यासाठी पालिकेचे कोविड सेंटरही आता अपुरे पडू लागले आहे. अशातच पार्किंग प्लाझा कोविड सेंटरमधील ऑक्सिजनचा साठा संपुष्टात आल्याने येथील २६ रुग्णांना ग्लोबलमध्ये हलविण्यात आले आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. परंतु दुसरीकडे ग्लोबल रुग्णालयावरील ताण वाढला आहे. त्यातही रविवारीही पालिकेला आवश्यक असलेला ऑक्सिजनचा साठा उपलब्ध होऊ शकलेला नाही, त्यामुळे पार्किंग प्लाझा येथील ऑक्सिजनचे बेड सुरू झालेले नाहीत. पालिकेने संबंधित कंपनीकडे मागणी करूनही पालिकेला आवश्यक त्या प्रमाणात साठा उपलब्ध होऊ शकलेला नाही. 

रोज लागतात ४६ ऑक्सिजन सिलेंडर कल्याण- डोंबिवली या भागातही कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने येथील रुग्ण ठाणे महापालिकेच्या कोविड सेंटरकडे धाव घेत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या सेंटरवरील ताण वाढू लागला आहे. परंतु ऑक्सिजनचा साठा उपलब्ध होऊ शकत नसल्याने ग्लोबलमधील साठा संपुष्टात येण्यास वेळ लागणार नाही, अशी माहिती पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. महापालिकेच्या ग्लोबल रुग्णालयासाठी २० केएल रोज ऑक्सिजनची गरज लागते, तर पार्किंग प्लाझा येथे १३ आणि व्होल्टासलाही १३ केएलची ऑक्सिजन सिलेंडरची गरज रोजच्या रोज लागते.

ऑक्सिजन पुरवठ्यासाठी आयनॉक्सशी पालिकेने केला पत्रव्यवहारठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या कोविड रुग्णालयांना द्रव्य स्वरूपातील ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी पालिकेने आयनॉक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नामक कंपनीशी शनिवारी पत्रव्यवहार केला. बाळकूम येथील ग्लोबल हब कोविड रुग्णालय, ज्यूपिटर हॉस्पिटलजवळील पार्किंग प्लाझा कोविड रुग्णालय आणि पोखरण रोड येथे लवकरच सुरू होणारे व्होल्टास फॅसिलिटी सेंटर यासाठी ऑक्सिजन पुरवठा करण्याची विनंती महानगरपालिकेने आयनॉक्स कंपनीला केली आहेे. ग्लोबल हबला दोन दिवसांतून तीन वेळा २० केएल तर पार्किंग प्लाझा आणि व्होल्टास फॅसिलिटी सेंटरला अनुक्रमे १३ केएल ऑक्सिजन पुरवठा करण्याची मागणी पालिकेने केली आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस