शहरं
Join us  
Trending Stories
1
सोशल मीडियावरचे आरोप गडकरींनी लोकसभेत फेटाळले; म्हणाले, इथेनॉल मिश्रित इंधनावर ARAI ने १ लाख किमी...
2
बांगलादेशात युनूस सरकार मावळणार, संध्याकाळी मोठी घोषणा होणार; संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं
3
महाराष्ट्रातील सीमेवरील गावात गुजरातची घुसखोरी; सीमांकन हळूहळू वाढवत असल्याचा स्थानिकांचा दावा
4
'त्यांचे हाथ थरथरत होते, दडपणाखाली होते'; राहुल गांधी अमित शाहांच्या लोकसभेतील भाषणावर आता काय बोलले?
5
लग्नाआधीच मुलगी गरोदर; आईला कळताच तिच्या प्रियकराला घरी बोलवलं अन् मग...शेवट भयंकर!
6
आम्हाला तर पाकिस्तान सोबत येणे शक्य, पण हे दोन देश...; नव्या समूहासंदर्भात काय म्हणाला बांगलादेश
7
'स्वाभिमानाने जगणारा कोकणातला शेतकरी आज चिंतेत', वलसाड हापूसवरून भास्कर जाधव आक्रमक
8
व्हॉट्सअ‍ॅपवरची एक चूक थेट घेऊन जाऊ शकते तुरुंगात! 'ही' गोष्ट करताना किमान दहा वेळ विचार कराच
9
पाकिस्तानमध्ये कधी येणार? 'रेड सी फिल्म फेस्टिव्हल'मध्ये आलिया भटला चाहत्याचा प्रश्न; म्हणाली...
10
ऐश्वर्यासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर अखेर अभिषेक बच्चनने सोडलं मौन, म्हणाला- "माझ्या पत्नीला..."
11
धक्कादायक! दारुच्या नशेत होता बोगस डॉक्टर; YouTube पाहून ऑपरेशन, चुकीची नस कापली अन्...
12
Gold Silver Price Today: यावर्षी सोनं ₹५२,७९५ आणि चांदी ₹१००९३६ रुपयांनी महागली; आजही दरानं तोडले सर्व विक्रम, पाहा किंमत
13
पुढील वर्षात १ तोळा सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागणार? ब्रोकरेज फर्मने सांगितला मोठा आकडा
14
लुथरा बंधूंचे थायलंडमधून फोटो आले, पासपोर्टसह घेतले ताब्यात; कारवाईपासून वाचण्यासाठी पळाले खरे पण...
15
व्हॉट्सअप चॅट्स वाचण्यासाठी...! डीएसपी 'कल्पना वर्मा' यांच्या 'लव्ह ट्रॅप' प्रकरणात 'Love U यार...' ची एन्ट्री...
16
Geminid Meteor Shower: १३,१४ डिसेंबर ठरणार इच्छापूर्तीची रात्र; आकाशाकडे बघून करा 'हे' काम!
17
'एसी-थ्री टियर'मध्ये प्रवाशासोबत कुत्रा! रेल्वेतून नेता येतो का? व्हिडिओ व्हायरल होताच रेल्वे 'सेवा' झाली सक्रिय
18
माइंडमेश समिट २०२५: विद्या-कला-नीती पुरस्कारांची घोषणा; समाजाला आकार देणाऱ्यांचा सन्मान
19
३ महिन्यांतच गमावलेलं दुसरं बाळ, पहिल्यांदाच व्यक्त झाली सुनीता अहुजा, म्हणाली- "तिला श्वास घ्यायला त्रास व्हायचा..."
Daily Top 2Weekly Top 5

ऑर्डनन्स फॅक्टरीने तयार केले ऑक्सिजन मशीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अंबरनाथ : देशाच्या सैन्यासाठी शस्त्रे आणि इतर सामग्री तयार करणाऱ्या ऑर्डनन्स फॅक्टरीने हवेतून ऑक्सिजन वेगळा करणारे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबरनाथ : देशाच्या सैन्यासाठी शस्त्रे आणि इतर सामग्री तयार करणाऱ्या ऑर्डनन्स फॅक्टरीने हवेतून ऑक्सिजन वेगळा करणारे मशीन तयार केले आहे. ऑर्डनन्स फॅक्टरीच्या एमटीपीएफ कंपनीतील कामगारांनी हे मशीन तयार केले आहे.

ऑर्डनन्स फॅक्टरीत देशाच्या सैन्यासाठी दारूगोळा तयार करण्याचे काम केले जाते, तर याच फॅक्टरीच्या एमटीपीएफ कारखान्यात सैन्य आणि नौदलासाठी लागणाऱ्या वाहनांचे पार्टस तसेच इतर अनेक संरक्षणात्मक सामग्री तयार केली जाते. देशातील सर्वांत चांगले अभियंते आणि तंत्रज्ञ यासाठी येथे मेहनत घेत असतात. याच कारखान्याने आता थेट हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारी मशीन तयार केले आहे. मागील वर्षी देशात व्हेंटिलेटरचा तुटवडा असताना या कारखान्याने व्हेंटिलेटर आणि सॅनिटायझरचीही निर्मिती केली होती, तर यावर्षी ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे या कारखान्याने ऑक्सिजन निर्मिती करणारी मशीन तयार केली आहेत.

या कारखान्यात नायट्रोजन गॅस तयार करणाऱ्या दोन मशीन यापूर्वी कार्यरत होत्या. त्यापैकीच एका मशीनमध्ये बदल करून हे ऑक्सिजन मशीन तयार करण्यात आले आहे. ऑर्डनन्स फॅक्टरी परिसरात काही दिवसात एक कोविड रुग्णालय सुरू होणार असून त्यात हे मशीन बसविले जाणार आहे. ऑक्सिजन निर्मिती करून थेट रुग्णांपर्यंत हा ऑक्सिजन पोहोचविला जाईल. याद्वारे दिवसाला ४८ हजार लिटर ऑक्सिजनची निर्मिती केली जाणार आहे.

---------------------------------------------------------

ऑक्सिजनची गरज पाहता कंपनीतील यंत्रसामग्रीचा वापर करून ऑक्सिजन निर्मिती करणारे मशीन तयार करण्यात आले आहे. त्याचा वापर कोरोना रुग्णांवर करता येणार आहे.

- राजीव कुमार, सरव्यवस्थापक, एमटीपीएफ, अंबरनाथ