शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पतंगाच्या मांजात गवई घुबड झाले जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2018 18:47 IST

शहराच्या पश्चिम भागातील भागशाळा मैदानात पतंगाच्या मांजात गवई घुबड जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. हे घुबड जखमी झाल्याचे कळताच प्लांट अ‍ॅण्ड अनिमल वेल्फेअर सोसायटी

डोंबिवली - शहराच्या पश्चिम भागातील भागशाळा मैदानात पतंगाच्या मांजात गवई घुबड जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. हे घुबड जखमी झाल्याचे कळताच प्लांट अ‍ॅण्ड अनिमल वेल्फेअर सोसायटी या सामाजिक संस्थेने घाव घेऊन घुबडावर उपचार केले आहे.सोसायटीच्या हेल्पलाईनला फोन आला. तेव्हा सोसायटीने भागशाळा मैदानात धाव घेतली. गवई घुबड या जातीच्या घुबडाच्या गळयाला मांजा फसला होता. त्यात तो गंभीर जखमी झाला. या जातीचे घुबड हे शहरी भागात आढळून येते. त्याच्यावर उपचार करुन त्याला आज रात्री सोडून देण्यात येणार आहे अशी माहिती सोसायटीचे प्रमुख निलेश भगणे यांनी दिली आहे.

मकर संक्रात आली की पतंग उडविण्याचे प्रमाण वाढते. दोन दिवसापासून पतंग उडविण्यास सुरुवात झाली असून पतंगाच्या मांजामुळे जखमी झालेला गवई घुबडाची केस पहिली आहे. मकर संक्रातीच्या दिवशी अनेक ठिकाणी पतंग महोत्सव आयोजित केले जातात. त्यावेळी किती पक्षी जखमी होतील याची केवळ कल्पनाच केलेली बरी. पक्षी जखमी होण्याचे प्रमाण असेल तरी सोसायटीच्या हेल्पलाईनला फोन केल्यावर सोसायटीचे कार्यकर्ते त्याठिकाणी तातडीने पोहतील अशी माहिती भगणे यांनी दिली आहे.

कल्याणमध्ये गणेश घाट खाडी परिसरात मकरसंक्रातीच्या दिवशी पतंग महोत्सवाचे आयोजन केले आहे. यासंदर्भात महोत्सवाचे पदाधिकारी चंद्रकांत गधर यांच्याकडे विचारणा केली असता महोत्सवाचे आयोजन केले असले तरी पक्षांना इजा होणार नाही यासाठी काय उपाययोजना केली आहे. याविषयी काही एक बोलण्यास त्यांनी नकार दिला.

कल्याण खाडी परिसरात पक्षांचा वापर जास्त आहे. या पतंग महोत्सवामुळे पक्षी जास्त प्रमाणात गंभीर होऊ शकतात. याकडे सोसायटीने लक्ष वेधले आहे. पंतगासाठी मांजा वापरण्यावर बंदी असताना सर्रासपणे मांजाचा वापर केला जातो. त्यामुळे पक्षी जखमी होतात. प्रसंगी त्यांचा मृत्यू होतो. ठाण्यात डिसेंबर महिन्यात पक्षी मित्र संमेलन पार पडले. यावेळी हा मुद्दा प्रकर्षाने मांडला गेला होता.फोटो आहे. 

 

टॅग्स :Makar Sankranti 2018मकर संक्रांती २०१८