शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
4
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
5
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
6
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
7
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
8
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
9
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
10
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
11
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
12
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
13
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
14
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
16
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
17
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
18
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
19
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून ईव्हीएम मशिन्ससह जिल्ह्यातील निवडणूककामांचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 18:39 IST

येथील जिल्हा नियोजन समितीमध्ये बलदेव सिंग यांच्या अध्यक्षतेखाली खास बैठक आज पार पडली. या बैठकीला कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, निवासी उप जिल्हाधिकारी शिवाजी पाटील, निवडणूक उप जिल्हाधिकारी अपर्णा सोमाणी यांच्यासह निवडणूक कामकाजाशी संबंधीत जिल्ह्यातील अधिकारी मोठ्यासंख्येने उपस्थित होते

ठळक मुद्देराज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग यांनी रविवारी सकाळी ठाण्यात ईव्हीएम मशीन्सच्या गोडाऊन्सची देखील पाहाणी गुन्हे निकाली काढण्याच्या दृष्टीने केलेली कार्यवाही

ठाणे : विधान सभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील निवडणूक यंत्रणा युध्द पातळीवर कामाला लागली आहे. या कामकाजाचा व तयारीचा आढावा प्रत्यक्ष राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग यांनी रविवारी सकाळी ठाण्यात घेतला. यावेळी त्यांनी ईव्हीएम मशीन्सच्या गोडाऊन्सची देखील पाहाणी करून संबंधीताना मार्गदर्शन केले.येथील जिल्हा नियोजन समितीमध्ये बलदेव सिंग यांच्या अध्यक्षतेखाली खास बैठक आज पार पडली. या बैठकीला कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, निवासी उप जिल्हाधिकारी शिवाजी पाटील, निवडणूक उप जिल्हाधिकारी अपर्णा सोमाणी यांच्यासह निवडणूक कामकाजाशी संबंधीत जिल्ह्यातील अधिकारी मोठ्यासंख्येने उपस्थित होते. या आढाव्या पूर्वी प्रथम या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (ईव्हीएम) असलेल्या कोपरी येथील गोदाम क्र.१ ला भेट दिली. यावेळी त्यांनी या निवडणूक मशिन्स संबंधी चाललेल्या कामकाजाची पाहणी केली. या कामात येणाऱ्यां अडचणी समजून घेतल्या. या कामाला वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन ही त्यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना दिले.बैठकीतील आढाव्या प्रसंगी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी २०१९ मध्ये नोंद झालेले दिव्यांग मतदार, त्यांना दिल्या जाणाऱ्यां सुविधा, विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशिक्षण कार्यक्र म, नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्र ारींवर केलेली कार्यवाही, लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्यावेळी दाखल करण्यात आलेले गुन्हे निकाली काढण्याच्या दृष्टीने केलेली कार्यवाही आदी कामांचा आढावा त्यांनी घेतला. याशिवाय सिंग यांनी दुबार नोंदणी व मयत मतदारांची नावे मतदार यादीतून वगळणे, मतदारांमध्ये मतदान करण्याबाबत जागृती करणे आदी मुद्यांवरही चर्चा करु न जिल्हह्यातील निवडणूक कामकाज संबंधीच्या अधिकाऱ्यांना माग्रदर्शन केले.

टॅग्स :thaneठाणेcommissionerआयुक्त