शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

हंडाभर पाण्यासाठी रात्रभर विहिरीवर..! गावपाड्यांमध्ये पाणीटंचाईचे विदारक चित्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 03:51 IST

ठाण्यासह मुंबईचीही तहान भागवणाऱ्या शहापूर तालुक्यातील गावपाड्यांना पाणीटंचाईचे असह्य चटके सोसावे लागत आहेत.

- जनार्दन भेरेभातसानगर : ठाण्यासह मुंबईचीही तहान भागवणाऱ्या शहापूर तालुक्यातील गावपाड्यांना पाणीटंचाईचे असह्य चटके सोसावे लागत आहेत. हंडाभर पाण्यासाठी मध्यरात्रीपासूनच विहिरीवर थांबावे लागत असल्याने या भागातील ग्रामस्थ पुरते हैराण झाले आहेत.शहापूर तालुक्यातील गोलभन, अजनुप, गायदरा, कोळीपाडा इत्यादी गावांमधील पाणीटंचाईचा आढावा घेतला असता, येथील विदारक परिस्थिती उघड झाली. विहिरीमध्ये थेंबथेंब साठणारे पाणी घेण्यासाठी गावपाड्यांचे रहिवासी मध्यरात्रीपासूनच नंबर लावतात.कोळीपाड्यासाठी गावाच्या बाजूला एक विहीर बांधली खरी; मात्र या विहिरीतील पाणी दिवाळीदरम्यानच संपले. तेव्हापासूनच या पाड्याचा पाण्यासाठीचा वनवास सुरू झाला. आजमितीस या पाड्यातील नागरिक जे पाणी पितात, ते पाहून कुणाचेही काळीज धस्स झाल्याशिवाय राहणार नाही.या पाड्याच्या बाजूला इमारतीच्या कामासाठी बांधला जातो तसा लहानसा हौद आहे. यातील गुडघाभर पाण्यात बेडूक मरण पावले आहेत. हे हिरवेगार दुर्गंधीयुक्त पाणी झिरपून १०० मीटर अंतरावरील एका दगडाच्या कपारीतून बाहेर येते. हे पाणी पेल्यापेल्याने घेऊन आपला हंडा भरण्याचे काम येथील महिला करतात. हेच पाणी ग्रामस्थ पिण्यासाठी वापरतात.वापरण्यासाठी तर अतिशय घाणेरडे पाणी असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. केवळ निवडणुकीच्यावेळी आमची आठवण राजकारणी लोकांना होते. नंतर, मात्र आमच्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.तालुक्यातील सर्व गावांचा पाणीप्रश्न कायमचा सुटावा, यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. ज्या गावांमध्ये पाणीटंचाई आहे, त्यांना तत्काळ टँकरने पाणी पुरवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.- पांडुरंग बरोरा, आमदार, शहापूरआमच्या गावात पाण्याची भीषण पाणीटंचाई असून हंडाभर पाण्यासाठी मध्यरात्रीपासूनच विहिरीवर ठाण मांडावे लागते. पाण्यासाठीच दिवसरात्र घालवावा लागत असल्याने त्याचा परिणाम ग्रामस्थांच्या कामधंद्यावर होत आहे. - भारती कैलास जाधव,ग्रामस्थ, कोळीपाडा

टॅग्स :Waterपाणीthaneठाणे