शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात अतिउत्साही कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंना बॅनरवर दिली ‘हिंदुहृदयसम्राट’ची उपाधी

By जितेंद्र कालेकर | Updated: June 12, 2024 15:36 IST

वाढदिवसानिमित्त झळकले बॅनर, दोन वर्षांपुर्वीची पुनरावृत्ती

जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस १४ जून रोजी आहे. त्यानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ठाण्यात मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून बॅनर लावले आहेत. या बॅनरवर राज यांचा उल्लेख ‘हिंदुहृदयसम्राट’ असा केला आहे. यापूर्वीही दोन वर्षांपूर्वी ठाण्यात राज यांना शुभेच्छा देताना त्यांचा उल्लेख ‘हिंदुहृदयसम्राट’ असा केला होता. पण त्यावर दस्तुरखुद्द राज ठाकरेंनी नाराजी व्यक्त केल्यानंतर हे बॅनर काढले होते. पुन्हा यावर्षी अशाच आशयाचे बॅनर लागल्याने ठाण्यात राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांनी त्यांची वेशभूषा तसेच पक्षाची भूमिकाही बदलली आहे. या आधी मराठीच्या मुद्दयावर आक्रमक भूमीका घेणाऱ्या राज यांनी आता हिंदुत्वाच्या भूमीकडे वाटचाल करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार २०२२ मध्ये राज यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ठाण्यात मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी लावलेल्या शुभेच्छा बॅनरवरही राज याचा ‘हिंदुह्रदयसम्राट’ असा उल्लेख करण्यात आला होता. याच बॅनरवरुन त्यावेळी चांगलेच राजकारण रंगले होते. त्यामुळेच स्वत: राज यांनी यावर अशा उपाधीवर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर हे बॅनर हटविण्यात आले होते. त्यावेळीही स्वत: राज ठाकरे यांनी या देशात फक्त एकच हिंदूहृदयसम्राट ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे हेच होते, असे म्हटले होते. दरम्यान, पुन्हा ठाणे शहरात मनसेच्या पदाधिकाºयांनी बॅनरबाजी केली आहे. त्यात ठाण्याच्या तलावपाळी परिसरात आशिष डोके यांच्याकडून लावलेल्या बॅनरवर राज ठाकरे यांचा उल्लेख हिंदुह्रदयसम्राट असा केला आहे. हा बॅनर ठाणेकरांचे लक्ष वेधून घेत आहे.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेShiv SenaशिवसेनाBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे