शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

१ लाखहून अधिक नागरिकांची मालमत्ता कर भरण्यासाठी ऑनलाईनला पसंती; गेल्या वर्षीच्या तुलनेत ४० टक्क्यांनी वाढ

By धीरज परब | Updated: December 31, 2022 18:38 IST

पालिकेचे ॲप आणि संकेतस्थळ अद्यावत करत सरळ सुलभ सुविधा उपलब्ध करून दिली. परिणामी आतापर्यंत १ लाख ६०५ नागरिकांनी मालमत्ता कर ऑनलाईन पद्धतीने भरला आहे.

 मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेने नागरिकांना मालमत्ता कराचा भरणा ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी आवाहन केले होते. याच बरोबर पालिकेचे ॲप आणि संकेतस्थळ अद्यावत करत सरळ सुलभ सुविधाही उपलब्ध करून दिली. परिणामी आतापर्यंत १ लाख ६०५ नागरिकांनी मालमत्ता कर ऑनलाईन पद्धतीने भरला आहे. ऑनलाईन पद्धतीने कर भरणाऱ्यांच्या संख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. आतापर्यंत १२३ कोटी ५ लाख ७४ हजार एवढी कर वसुली झाली आहे. 

शहरातील नागरिकांना मालमत्ता कर भरण्यासाठी पालिकेच्या कर भरणा केंद्रात जाऊन रांगा लावाव्या लागत होत्या. यामुळे नागरिकांचा प्रचंड वेळ जायचा. याशिवाय येण्या-जाण्यासाठीही खर्च व्हायचा. पालिकेने ऑनलाईन कर भरण्याची सुविधा दिली होती मात्र त्याला फारसा प्रतिसाद काही कारणांनी मिळत नव्हता. आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त संजय शिंदे, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे अधिकारी राजकुमार घरत यांनी नागरिकांना ऑनलाईन कर भरणाकरणे सहज सुलभ व्हावे म्हणून ॲप व संकेतस्थळात काही बदल करून ते अद्यावत केले. तसेच ऑनलाईन सुविधेचा जास्तीत जास्त वापर करून नागरिकांनी कर भरावा, असे आवाहनही  केले जात होते. 

सदर आवाहनाला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद देत २९ डिसेंबर २०२२ च्या मध्यरात्रीपर्यंत १ लाख ६०५ नागरिकांनी ऑनलाईन कर भरणा केला आहे.  २९ डिसेंबर २०२१च्या मध्यरात्रीपर्यंत ऑनलाईन कर भरणा करणाऱ्या नागरिकांची संख्या ७२ हजार १९३ इतकी होती. गत वर्षीच्या तुलनेत ऑनलाईनकर भरणा करणाऱ्या नागरिकांच्या संख्येत ४० टक्के वाढ झाली आहे. 

ऑफलाईन पद्धती मध्ये रोखीने ७१ हजार ६५ मालमत्ता धारकांनी तर धनादेश व डिमांड ड्राफ्ट द्वारे ७४ हजार १४० मालमत्ता धारकांनी कर भरणा केला आहे. ऑनलाईन पद्धतीने ४८ कोटी ३१ लाख ४२ हजार तर  ऑफलाईन पद्धतीने ७४  कोटी ७४ लाख ३३ हजार इतका कर भरणा झाला आहे.   ऑनलाईन कर भरण्याचे प्रमाण आणखी वाढवण्याची आवश्यकता असून त्यासाठी पालिका आणखी प्रयत्न करणार असल्याचे आयुक्त ढोले म्हणाले. 

टॅग्स :TaxकरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकMira Bhayanderमीरा-भाईंदर