शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

...अन्यथा आम्हालाही महायुतीचा धर्म तोडावा लागेल, आनंद परांजपे यांचा इशारा

By अजित मांडके | Updated: March 20, 2024 14:52 IST

शिवतरे बारामतीचा महायुतीचा धर्म तोडत राहिले, महायुतीमध्ये शिवसेना देखील ज्या लोकसभेच्या जागा लढणार आहेत तिथे महायुतीचा धर्म राष्ट्रवादीचे पदाधिकारी देखील तोडू शकतात असा इशारा राष्टÑवादी (अजित पवार गट) प्रवक्ते आनंद परांजपे यांनी दिला आहे.

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  शिवतारे यांची समजूत काढून देखील सातत्याने बारामती लोकसभे मध्ये फिरून महायुतीचे वातावरण खराब करण्याचे काम करण्याचे काम विजय शिवतरे करीत आहेत. याचा अर्थ मुख्यमंत्री शिंदे यांचा आपल्या नेत्यांवर नियंत्रण नसल्याचे चित्र आहे. शिवतरे बारामतीचा महायुतीचा धर्म तोडत राहिले, महायुतीमध्ये शिवसेना देखील ज्या लोकसभेच्या जागा लढणार आहेत तिथे महायुतीचा धर्म राष्ट्रवादीचे पदाधिकारी देखील तोडू शकतात असा इशारा राष्टÑवादी (अजित पवार गट) प्रवक्ते आनंद परांजपे यांनी दिला आहे.शिवसेनेचे विजय शिवतरे यांच्याकडून वारंवार महायुतीचा धर्म तोडण्याचे काम केले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना समज दिल्यानतंरही त्यांच्याकडून वारंवार बारामतीमध्ये अजित पवार यांच्या विरोधात आगपाखड सुरु आहे. आम्हाला महायुतीचे वातावरण खराब होईल असे कृत्य करायचे नसल्याचेही परांजपे यांनी सांगितले. शिवतरे यांच्या कृत्यामुळे संपूर्ण महाराष्टÑात मुख्यमंत्री शिंदे यांचे म्हणने त्यांचेच नेते ऐकत नाहीत असा मेसेज जात असून ते चुकीचे असल्याचे ते म्हणाले. शिवतरे हे महायुतीच्या दुधात मीठ टाकत आहेत, परंतु पुरंदरच्या जनतेने त्यांना त्यांची जागा २०१९ ला दाखविली असल्याची आठवणही त्यांनी करुन दिली आहे.  ४८ लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचा धर्म  राष्ट्रवादी पाळत आहे. परंतु शिवसेनेकडून राष्टÑवादीचे शक्तीस्थळ राष्टÑवादीचा स्वाभिमान बारामती मध्ये महायुतीचे वातावरण खराब करण्याचे काम करीत आहे.संग्राम थोपटे यांना काँग्रेसच्या कोट्यातून मत्री पद का मिळाले नाही. त्यांनी आमच्यावर आरोप करण्यापेक्षा प्रांत अध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांना त्यांनी तो प्रश्न विचारला तर तो अधिक संयुक्तिक राहील असा सल्लाही त्यांनी दिला.कल्याणमधील भाजपच्या काही पदाधिकाºयांनी प्रदेश अध्यक्ष बावनकुळे यांना पत्र पाठवून मतदार संघाची मागणी केली आहे. यावर परांजपे यांनी भाष्य केले आहे. मतदार संघात आपल्या पक्षाचा उमेदवार आपल्या पक्षाचे चिन्ह उभ रहावे त्याची भावना असणे स्वाभाविक आहे. कल्याण मतदारसंघांमध्ये तीन आमदार  भाजपचे आहेत, भाजपच्या लोकांनी त्यांची भावना त्यांच्या वरिष्ठांकडे मांडली आहे. याच्यामध्ये गैर नसल्याचेही त्यांनी सांगितले. अमित शहा बरोबर राज ठाकरे यांची काय राजनीतिक चर्चा झाली आम्हाला माहीत नाही. जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य असेल असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारणShiv Senaशिवसेना