शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

रिक्षामध्ये विसरलेले ३.२५ लाखाचे दागिने डोंबिवलीच्या ज्येष्ठ नागरिकास परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 19:15 IST

डोंबिवलीचे एक वयोवृद्ध दाम्पत्य ठाण्यात आॅटोरिक्षामध्ये ३.२५ लाख रुपयांचे दागिने विसरले होते. चितळसर पोलिसांच्या प्रयत्नांमुळे या दाम्पत्यास त्यांचे दागिने परत मिळाले.

ठळक मुद्देचितळसर पोलिसांची कामगिरीसीसी कॅमेर्‍याच्या फुटेजचा आधारदागिन्यांचा तत्परतेने शोध

ठाणे : रिक्षामध्ये विसरलेले ३.२५ लाख रुपयांचे दागिने ज्येष्ठ नागरिकास पोलिसांनी शनिवारी परत केले. चितळसर पोलिसांनी ही कामगिरी केली.डोंबिवली येथील सम्राट हॉटेलजवळच्या गंगेश्वर गंगा हाऊसिंग सोसायटीचे रहिवासी राजरत्नम अरूणमयनायक नाडर (६८) हे शनिवारी नातेवाईकांना भेटण्यासाठी ठाण्यात आले. ठाणे रेल्वे स्थानक भागातून सकाळी ११ वाजता ते पत्नीसोबत रिक्षाने पोखरण रस्ता क्रमांक २ वरील सुभाषनगरकडे जाण्यास निघाले. त्यांच्याजवळच्या कापडी बॅगमध्ये काही कपडे, मिठाई आणि सुमारे ३ लाख २५ हजार रुपयांचे दागिने होते. ११.४५ वाजताच्या सुमारास ते सुभाषनगरातील महाकाली डेव्हलपर्सच्या कार्यालयासमोर उतरले. त्यावेळी त्यांचे चुलत भाऊ यबनेश्वर नाडर यांच्या दोन मुली त्यांना घेण्यासाठी आल्या. रिक्षातून उतरल्यानंतर राजरत्नम नाडर आणि त्यांची पत्नी दोन्ही मुलींसोबत निघून गेल्या. घरी पोहोचल्यानंतर १२.३0 वाजताच्या सुमारास कापडी बॅग रिक्षातच विसल्याचे त्यांच्या लक्षात आले. नाडर कुटुंबियांनी लगेच महालक्ष्मी डेव्हलपर्सच्या कार्यालयाजवळ येऊन चौकशी केली असता, रिक्षा निघून गेल्याचे समजले.नाडर यांनी याप्रकरणी चितळसर पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून लगेच तपास सुरू केला. चितळसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपतराव पिंगळे यांनी महालक्ष्मी डेव्हलपर्सच्या सीसी कॅमऱ्याचे फुटेज तपासले असता, नाडर यांनी ज्या रिक्षाने तपास केला त्या रिक्षाचा क्रमांक दिसला; मात्र तो अतिशय अस्पष्ट होता. या माहितीच्या आधारे पोलिसांनी प्रयत्न करून विटावा येथील संतोष परशुराम आंबेडकर (६५) याचा शोध लावला. दागिने, कपडे आणि मिठाई असलेली नाडर यांची बॅग पोलिसांनी त्याच्याकडून हस्तगत केली. हे दागिने तक्रारदार नाडर यांना परत करण्यात आले.चितळसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपतराव पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रविण बनगोसावी, पोलीस उपनिरीक्षक पुष्पराज सुर्वे आणि सुधिर कदम आदींनी ही कामगिरी केली.रिक्षा चालक निर्दोषरिक्षामध्ये विसरलेले ३.२५ लाखांचे दागिने चालकाने प्रवाशास स्वत:हून परत करणे अपेक्षित होते. पोलिसांना याबाबत विचारणा केली असता, रिक्षा चालकाने प्रवाशाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले. सुभाषनगरातील महालक्ष्मी डेव्हलपर्स कार्यालयाजवळ नाडर दाम्पत्यास सोडल्यानंतर रिक्षा चालक निघून गेला. मात्र रिक्षात बॅग असल्याचे लक्षात आल्यानंतर नाडर यांच्या शोधात तो घटनास्थळी आला. नाडर यांचा शोध न लागल्याने काही वेळाने त्याने पुन्हा या भागात येऊन प्रवाशांना शोधण्याचा प्रयत्न केला. महालक्ष्मी डेव्हलपर्सच्या सीसी कॅमेर्‍याच्या फुटेजमध्ये हे दिसत असल्याची माहिती चितळसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपतराव पिंगळे यांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिस