शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

Bhiwandi: भिवंडीत रायझींग डे निमित्त शांतता रॅलीचे आयोजन,हिंदू मुस्लिम बांधवांचा सहभाग 

By नितीन पंडित | Updated: January 5, 2024 19:22 IST

Bhiwandi News: एक जानेवारी पासून पोलिस दलातर्फे वर्धापन दिनी निमित्त रायझींग डे सप्ताह साजरा केला जातो .ज्यामध्ये नागरिकांमध्ये जाऊन विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती प्रबोधन व शाळकरी विद्यार्थ्यांना पोलिस दलाबद्दल माहिती देण्याचे उपक्रम राबविले जातात.

- नितीन पंडितभिवंडी -  एक जानेवारी पासून पोलिस दलातर्फे वर्धापन दिनी निमित्त रायझींग डे सप्ताह साजरा केला जातो .ज्यामध्ये नागरिकांमध्ये जाऊन विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती प्रबोधन व शाळकरी विद्यार्थ्यांना पोलिस दलाबद्दल माहिती देण्याचे उपक्रम राबविले जातात.भिवंडी पोलिस उपायुक्त परिमंडळ क्षेत्रात पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी पोलीस रेझिंग डे निमित्ताने स्व.आनंद दिघे चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या दरम्यान शांतता समिती,कौमी एकता समिती सदस्य यांच्या उपस्थितीत शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.या रॅलीमध्ये पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे, आमदार महेश चौघुले, पालिका आयुक्त अजय वैद्य यांसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते,वकील संघटनांचे पदाधिकारी,सेवा निवृत्त सैनिक, महाविद्यालयीन  विद्यार्थी, शांतता समिती सदस्य,महिला दक्षता कमिटी, पोलीस मित्र व शहरातील हिंदू मुस्लिम धर्मीय नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

शांतीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर इंदलकर यांच्या नेतृत्वाखाली स्वामी विवेकानंद इंग्लिश हायस्कूल सुभाष नगर या शाळेतील विद्यार्थी,विद्यार्थिनी यांची महिला सुरक्षिता व वाहतूक सुरक्षितते साठी रॅली काढण्यात आली.सदर रॅली सुभाष नगर येथुन सुरू होवून सुभाष नगर पोलीस चौकी येथे समाप्त झाली.त्यानंतर उपस्थित पोलीस अंमलदार यांनी महिला सुरक्षिततेबाबत विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.तर गोपाळ नगर येथील डी डी दांडेकर विद्यालय येथील विद्यार्थी विद्यार्थिनींना पोलीस ठाण्यात आणून त्यांना पोलीस ठाणेतील शस्त्रांची तसेच कामकाजा बाबत माहिती देवून मार्गदर्शन करण्यात आले. 

या उपक्रमात नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत कामत यांच्या नेतृत्वाखाली अंजुरफाटा येथील महादेव बाबुराव चौगुले महाविद्यालय येथे सायबर क्राईम तसेच महिला सुरक्षा या विषयी मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.या कार्यक्रमात पोलिस हवालदार विजय सोनवणे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना सायबर क्राईम संदर्भात उपयुक्त मार्गदर्शन केले.तर महिला पोलिस उपनिरीक्षक सोनाली पाटील यांनी सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून महिला सुरक्षा संदर्भात विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.निजामपूर पोलिस ठाणे क्षेत्रात छत्रपती शिवाजी महाराज चौकात पथनाट्याद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व कार्यक्रमांना विद्यार्थ्यांसह नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.

टॅग्स :bhiwandiभिवंडीStudentविद्यार्थी