शहरं
Join us  
Trending Stories
1
येमेनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी ठार
2
केंद्र सरकारच्या GST सुधारणांना विरोधी पक्षांचा पाठिंबा, पण..; जयराम रमेश स्पष्टच बोलले
3
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
4
प्रेमप्रकरणातून आंबा घाटात तरूणीचा खून; मृतदेह दरीत फेकून दिला
5
'कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?'; रोजच्या परवानगीच्या अटीमुळे मनोज जरांगे पोलिसांवर चिडले
6
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
7
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
8
क्वाड शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार? समोर आली मोठी माहिती...
9
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
10
सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ
11
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
12
KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)
13
अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले
14
इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून गोंधळ, जमावाने विधानसभा जाळली; तिघांचा मृत्यू
15
सपा-काँग्रेसनं रचला संभलची डेमोग्राफी बदलण्याचा कट, हिंदूंना ठरवून लक्ष्य केलं गेलं! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा
16
'बिहारसाठी मीच योग्य', तेजस्वी यादवांनी राहुल गांधींसमोर मुख्यमंत्रिपदावर ठोकला दावा
17
विरार इमारत दुर्घटना प्रकरण; विकासक, जागामालकांसह ५ जणांना अटक
18
'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय?
19
Nagpur Crime: एंजेलसारखीच मोनिकाची झाली होती हत्या; नागपुरात ११ मार्च २०११ रोजी काय घडलं होतं?
20
सरकारसोबतची पहिली बैठक अयशस्वी; तुम्ही आमच्या जीवाशी खेळताय, मनोज जरांगे पाटील संतापले

ब्रिजभूषण सिंग यांच्या अटकेसाठी ठाण्यातील संघटनांचे राष्ट्रपतींना साकडे

By सुरेश लोखंडे | Updated: May 19, 2023 19:59 IST

महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनाला स्थानिक पातळीवरही मिळतोय पाठिंबा

सुरेश लोखंडे, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: नवी दिल्ली येथील जंतरमंतर राेडवर महिला पैलवानांनी आंदाेलन सुरू केलेले आहे. त्यास पाठिंबा देत आंदाेलनास अनुसरून  मनमानी करणारे खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांना तात्काळ अटक करावी, त्यांना राजकीय व प्रशासकीय पदावरून हटवण्यात यावे आदी मागण्यांसाठी ठाण्यातील विविध संघटनांनी आज एकत्र येत राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांना ठाणे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत आज निवेदन दिले.

खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या या मनमानी विरोधात एकत्र येऊन महिला पैलवानांच्या आंदाेलनाला पाठिंबा देण्यासाठी ठाण्यातील जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय, श्रमिक जनता संघ, स्वराज अभियान, भारतीय महिला फेडरेशन आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती आदीं संघटनांनी एकत्र आल्या आहेत. या संघटनेच्या पदाधिकार्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल तहसीलदार रेवण लेंभे यांची भेट घेऊन त्यांनी राष्ट्रपती यांचे निवेदन त्यांना सुपुर्द केले. या निवेदनात त्यांनी सिंग यांना त्वरित अटक करून सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. यावेळी शिष्टमंडळात समाजसेविका शुभदा चव्हाण, निर्मला पवार, जगदीश खैरालिया, अजित डफळे, डॉ संजय मंगला गोपाळ आणि सुब्रतो भट्टाचार्य आदीचा सहभाग हाेता.

निवेदनात खालील मागण्या-

  1. खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांना तात्काळ अटक करा
  2. डब्ल्यूएफआयसह त्यांना राजकीय, प्रशासकीय पदांवरून हटवण्यात यावे.
  3. न्यायालयाच्या देखरेखीखाली पोलिस तपास सुरू करा
  4. निरीक्षण समितीच्या निष्कर्षांचा अहवाल सार्वजनिक करा
टॅग्स :Wrestlingकुस्तीthaneठाणे